पाचवा वनडेही जिंकला; विराटचे नाबाद शतक

0
97

भारताचा श्रीलंकेला ‘क्लीन स्वीप’
कर्णधार विराट कोहलीच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर भारताने शेवटच्या सामन्यातही ३ गडी राखून विजय मिळवित श्रीलंकेला ५-० असा क्लीन स्विप दिला. सामनावीर म्हणून श्रीलंकन कर्णधार अँजेलो मॅथ्यूजची निवड करण्यात आली. तर मालिकावीराचा पुरस्कार भारतीय कर्णधार विराट कोहलीला प्राप्त झाला. श्रीलंकेकडून मिळालेले २८७ धावांचे विजयी लक्ष्य भारताने ४८.४ षट्‌कांत ७ गडी गमावत गाठले. कर्णधारी शतकी खेळी केलेल्या कोहलीने अजंथा मेंडीसला ४९व्या षट्‌कांत दोन षट्‌कांत खेचत भारताचा विजय साकरताना श्रीलंकेला ५-० असा क्लीन स्विप दिला. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलताना कर्णधार कोहलीने १२६ चेंडूत १२ चौकार आणि ३ षट्‌कारांच्या साहाय्याने नाबाद १३९ धावांची दमदार शतकी खेळी केली. धावचित झालेल्या अंबाती रायडूने ५९, आपला पहिलाच सामना खेळणार्‍या केदार जाधवने २०, स्टुअर्ट बिन्नीने १२ तर अक्षर पटेलने १७ धावांचे योगदान दिले. लंकेतर्फे अजंथा मेंडीसने सर्वाधिक ४ तर कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने गोलंदाजीतही चमकदार कामगिरी करताना २ गडी बाद केले.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून श्रीलंकन कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व ८ गडी गमावत २८६ अशी धावसंख्या उभारली. अँजेलो मॅथ्यूजने कर्णधारी खेळी करताना ६ चौकार आणि १० उत्तुंग षट्‌कारांची आतषबाजी करीत १३९ धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याने लाहिरू थिरिमानेच्या साथीत पाचव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण १२८ धावांची भागिदारी केली. थिरिमानेने ५२, तिलकरत्ने दिलशानने ३५ तर महेला जयवर्धनेने ३२ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. भारतातर्फे धवल कुलकर्णीने सर्वाधिक सर्वाधिक, अक्षर पटेल व रवीचंद्र अश्विन यांनी प्रत्येकी २ तर स्टुअर्ट बिन्नीने १ गडी बाद केला.
धावलफक,
श्रीलंका : निरोशन डिकवेला झेल अंबाती रायुडू गो. धवल कुलकर्णी ४, तिलकरत्ने दिलशान त्रिङ्गळाचीत स्टु्‌अर्ट बिन्नी ३५, दिनेश चांदिमल झेल रोहित शर्मा गो. अक्षर पटेल ५, महेला जयवर्धने झेल अजिंक्य रहाणे गो. रविचंद्र अश्विन ३२, अँजेलो मॅथ्युज नाबाद १३९, लाहिरू थिरिमाने झेल अंबाती रायुडू गो. रविचंद्र अश्विन ५२, थिसारा परेरा झेल केदार जाधव गो. अक्षर पटेल ६, सीक्कुगे प्रसन्ना झेल Aअक्षर पटेल गो. धवल कुलकर्णी ०, अजंथा मेंडिस झेल कर्ण शर्मा गो. धवल कुलकर्णी ०.
अवांतर : १३. एकूण ५० षट्‌कांत ८ बाद २८६ धावा.
गोलंदाजी : धवल कुलकर्णी ८/०/५७/३, स्टु्‌अर्ट बिन्नी ८/१/२८/१, अक्षर पटेल १०/०/४५/२, रविचंद्र अश्विन १०/१/५६ /२, कर्ण शर्मा १०/०/६१/०, अंबाती रायुडू ४/०/३३/०.
भारत : अजिंक्य रहाणे त्रिङ्गळाचीत अँजेलो मॅथ्युज २, रोहित शर्मा त्रिङ्गळाचीत अँजेलो मॅथ्युज ९, अंबाती रायुडू धावचीत शमिंदा इरंगा ५९, विराट कोहली नाबाद १३९, रॉबिन उथप्पा झेल अँजेलो मॅथ्युज गो. अजंथा मेंडिस १९, केदार जाधव त्रिङ्गळाचीत अजंथा मेंडिस २०, स्टुअर्ट बिन्नी यष्टीचीत दिनेश चांदिमल गो. अजंथा मेंडिस १२, रविचंद्र अश्विन पायचीत अजंथा मेंडिस ०, Aअक्षर पटेल नाबाद १७. अवांतर ः ११. एकूण ४८.४ षट्‌कांत ७ बाद २८८ धावा.
गोलंदाजी ः अँजेलो मॅथ्युज ७/१/३३/२, लाहिरू गमागे ४/०/२५/०, शमिंदा इरंगा ७/०/४५/०, सीक्कुगे प्रसन्ना १०/०/४२/०, थिसारा परेरा ३/०/२०/०, अजंथा मेंडिस ९.४/०/७३/४, तिलकरत्ने दिलशान ८/०/४६/०.