पाक-चीनबरोबर युध्दाची शक्यता नाही

0
67

>> राज्यसभेत सुषमा स्वराजांचे भाष्य

भारताचे नजीकच्या भविष्यात पाकिस्तान किंवा चीनशी युध्द होण्याची शक्यता भारताच्या विदेश व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल राज्यसभेत नाकारली. विरोधकांनी केंद्र सरकारच्या विदेश धोरणाविषयी विचारलेल्या प्रश्‍नांवर बोलताना स्वराज यांनी कोणत्याही देशाबरोबरील प्रश्‍न युध्दाने सुटू शकत नाही असे स्पष्ट केले. युध्द झाल्यानंतरही तोडग्यासाठी बोलणी करावी लागतात. त्यामुळे राजनैतिक पातळीवरून प्रश्‍न सोडवण्यातच शहाणपण आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
देशाच्या विद्यमान विदेश धोरणाचे जोरदार समर्थन करताना स्वराज यांनी आज या धोरणामुळेच अमेरिका व रशियासुध्दा भारताच्या बाजूने असल्याचा दावा केला. त्याआधी त्यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका केली. भारताच्या नेतृत्वाकडे चीनबरोबरील संबंधांबाबत माहिती घेण्याआधी आपल्या प्रमुख विरोधी पक्षाचे नेते चिनी राजदुतांची भेट कशी काय घेतात असा सवाल त्यांनी केला. शांती व मित्रत्वासाठी भारताने पाकिस्तानला प्रस्ताव दिला आहे.