पाकला आर्थिक मदत देणार नाही ः ट्रम्प

0
126

भविष्यात पाकिस्तानला कोणतीही आर्थिक मदत न देण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे. गेल्या १५ वर्षांपासून अमेरिकेने पाकिस्तानला सातत्याने आर्थिक मदत केली. मात्र त्या बदल्यात पाकिस्तानने आपल्याला कपट व फसवणुकीच्या व्यतिरिक्त आणखी काहीच दिले नाही असे ट्विट ट्रम्प यांनी काल केले आहे.

ट्विटमध्ये ट्रम्प यांनी नमूद केले आहे की अमेरिकेने २०१२ पासून मूर्खाप्रमाणे पाकिस्तानला ३३०० कोटी डॉलर्सची मदत देऊ केली. मात्र त्या बदल्यात अमेरिकेला काहीच मिळाले नाही. दहशतवादाला जोपासण्याच्या पाकिस्तानच्या धोरणावरही ट्रम्प यांनी कडक टीका केली आहे. पाकने त्यांच्या देशात दहशतवाद्यांना आसरा दिला आणि आम्ही अफगाणिस्तानात दहशतवाद्यांना शोधत राहिलो. यापुढे ते खपवून घेणार नाही. असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकमध्ये निवडणूक लढविण्यास देण्याची घोषणा झाल्यावेळीही ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती.