पाकमध्ये ‘नो एन्ट्री’

0
110

भारताच्या अंध क्रिकेट संघाला पाकिस्तान’धील विश्‍वचषक स्पर्धेत खेळण्यासाठीची परवानगी विदेश ’ंत्रालयाने नाकारली आहे. विश्‍वविजेता भारतीय संघ ८ जानेवारी रोजी फैसलाबाद येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार होता. यानंतर पाकिस्तानमध्ये अन्य दोन साखळी सामने व संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारताचे दोन सामने होणार होते. पाकिस्तान अंध क्रिकेट परिषदेने (पीबीसीसी) स्पर्धेचे वेळापत्रक बदलले असून नवीन वेळापत्रकानुसार भारतीय संघ ८ रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील अजमन येथे आपला पहिला सामना खेळेल. यानंतर श्रीलंका (१० जानेवारी), पाकिस्तान (१२ जानेवारी), बांगलादेश (१३ जानेवारी) व नेपाळ (१४ जानेवारी) विरुद्ध अजमन मैदानावर खेळणार आहे. भारताने अंतिम फेरी गाठल्यास व भारत सरकारने परवानगी दिली तरच २१ जानेवारी रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडयमवर अंतिम सामना होईल. अन्यथा १९ रोजी शारजा येथे अंतिम सामना खेळविला जाणार आहे.