पाकमधून शरण आलेल्यांचाही भारतावर हक्क : अमित शहा

0
123

>> चार महिन्यांत राम मंदिर उभारणार : ममता बॅनर्जी, कॉंग्रेसवर जोरदार टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएएवरून काल कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्हाला जेवढा विरोध करायला असेल तेवढा करा. आम्ही सर्व लोकांना नागरीकत्व देऊनच शांत बसणार अशा शब्दात शहा यांनी कॉंग्रेसला ठणकावले. तसेच भारतावर जेवढा आम्हा सर्वांचा अधिकार आहे तेवढाच तो पाकिस्तानातून शरण आलेल्या हिंदू, शीख, बौध्द व ख्रिश्‍चन धार्मियांनाही आहे असे त्यांनी सुनावले. राम मंदिर निर्माणाबाबत बोलताना त्यांनी चार महिन्यांत भव्य राम मंदिर उभारण्यात येईल असे सांगितले.

सीएएविषयी जनजागृतीसाठी जबलपूर येथे आयोजिलेल्या रॅलीला शहा संबोधित होते. संपूर्ण देशभरात सध्या कॉंग्रेसकडून सीएएविरोधात वातावरण निर्मिती केली जात आहे. आपण कॉंग्रेस नेते राहुल गांधी व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याना आव्हान देतो, सीएएमुळे कोणाचेही नागरिकत्व हिरावण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सिध्द करून दाखवावे. या कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची नाही तर ते देण्याची तरतूद आहे असे ते म्हणाले.

राम मंदिर निर्माणावरूनही शहा यांनी कॉंग्रेस नेत्यांवर टोला लगावला. या संदर्भात त्यांनी कपिल सिब्बल यांना लक्ष्य केले ते म्हणाले की सिब्बल यांनी मंदिर निर्माण रोखण्यासाठी हवी तेवढी शक्ती पणास लावावी. मात्र आम्ही चार महिन्यांत भव्य राम मंदिर उभारू अशी गर्जना शहा यांनी केली.
जेएनयूमध्ये काहींनी भारतविरोधी घोषणा दिल्याचा उल्लेख करून त्यांना तुरुंगात डांबायला हवे की नको असा सवाल त्यांनी केला. जे कोणी भारतविरोधी घोषणाबाजी करतील त्यांची जागा तुरुंगात असेल असे ते म्हणाले.