पाकचा दुसरा पराभव

0
125

पाकिस्तानचा दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे ८ गडी व ७ चेंडू राखून पराभव करत यजमान न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून २४९ धावा केल्या. पाकतर्फे मोहम्मद हफीझने सर्वाधिक ६० धावांचे योगदान दिले तळाला गोलंदाज शादाब खान (५२) व हसन अली (५१) यांनी अर्धशतके लगावत पाकला सन्मानजनक स्थिती गाठून दिली. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने ३९ धावांत ३ गडी बाद केले. तर स्विंग गोलंदाज साऊथी व लेगस्पिनर टॉड ऍस्टल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. पावसामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी २५ षटकांत १५१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. मार्टिन गप्टिलच्या ७१ चेंडूंतील नाबाद ८६ धावांच्या बळावर किवीज संघाने २३.५ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. रॉस टेलर ४५ धावा करून नाबाद राहिला. पावसाने बाधिक झालेल्या पहिल्या सामन्यातही न्यूझीलंडने विजय मिळविला होता. मालिकेतील तिसरा सामना १३ रोजी ड्युनेडिन येथे खेळविला जाणार असून आव्हान राखण्यासाठी पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागणार आहे.