पाककडून कुलभूषणांचा नवा व्हिडिओ जारी

0
231

>> भारताविरुध्द कांगाव्याचा प्रयत्न

पाकिस्तानच्या कैदेतील भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांचा एक नवीन व्हिडिओ पाकने जारी केला असून त्याद्वारे जाधव यांच्या तोंडून पाककडून आपल्याला चांगली वागणूक दिली जात असल्याचा प्रचार करण्यात आला आहे. या व्हिडिओत जाधव यांनी आपण अजूनही भारतीय नौदलाचा अधिकारी असल्याचे म्हटले आहे. भारताचे म्हणणे खोटे पाडण्याचा प्रयत्न पाकने या व्हिडिओद्वारे केल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतासाठी गुप्तहेरी केल्याचा आरोपावरून पाकिस्तानने जाधव यांना ताब्यात घेऊन कैदेत ठेवले आहे. या नव्या व्हिडिओत जाधव यांनी गेल्या आठवड्यात पाकिस्तानात त्यांची भेट पत्नी व आई यांच्याबरोबर घडवून आणली होती त्याचा उल्लेख केला असून या प्रकरणीही पाकिस्तानने उलटा कांगावा केला आहे. या भेटीवेळी भारतीय अधिकारी आपली पत्नी व आई यांच्यावर ओरडत होते असेही जाधव यांनी व्हिडिओत म्हटले आहे.