पर्वरीतील अपघातात बेळगावचा युवक ठार

0
167

गिरी-तिस्क येथे काल झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार मृत्युमुखी पडला. पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला. मृत युवक खानापूर (बेळगाव) येथील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल सकाळी ११ वाजता गिरी तिस्कावरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या जीए-०८-के-२५८५ क्रमांकाच्या कारला मोटारसायकल क्र केए-२२, इएन -३३५९ वरून आलेल्या खानापूर (बेळगाव) येथील युवक जयवंत देसाई याने कारच्या मागील भागाला धडक दिली. त्यात तो युवक गंभीर जखमी झाला.

गोमेकॉमध्ये त्याला नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी माहिती दिल्याप्रमाणे सदर युवक भरवेगाने विरुद्ध दिशेने येऊन अचानक वळण घेऊन परतला त्यावेळी तो घसरून त्याचा वाहनावरील ताबा गेल्यामुळे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या मारुती कारवर येऊन धडकला. जबरदस्त धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पर्वरी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सगुण सावंत यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला.