पर्रीकर यांच्या ‘त्या’ वक्तव्याचीही निवडणूक आयोगाकडून चौकशी

0
86

कोणत्याही पक्षाकडून पैसे घ्या व मते कमळालाच द्या, या संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वक्तव्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्यासंबंधी गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी केलेल्या तक्रारीवर चौकशी सुरू असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी सांगितले. निवडणूक आचारसंहिता जारी झाल्याच्या दिवसापासून ८३ लाख रुपये किंमतीचे ७२ हजार ६०० लीटर मद्य तर ३२ लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्याच्या सर्व चेक नाक्यांवर तपासणी चालू असून निवडणूक जवळ आल्यानंतर जलद भरारी पथकेही तैनात केली जातील असे त्यांनी सांगितले.