पर्रीकर मे महिन्यात गोव्यात

0
124

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेतील उपचार पूर्ण करून येत्या मे महिन्यात गोव्यात परतणार असल्याचे भाजपतर्फे काल अधिकृतरित्या सांगण्यात आले. भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर सध्या अमेरिकेत उपचार चालू असून उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत आहेत. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. आपल्यावरील सगळे उपचार पूर्ण करून पर्रीकर हे पुढील महिन्यात गोव्यात परतणार असल्याचे तानावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उपचारासाठी अमेरिकेत गेल्यानंतर काल पहिल्यांदाच उपचार पूर्ण करून ते गोव्यात कधी परतणार आहेत त्याविषयीची अधिकृत माहिती पक्षातर्फे देण्यात आली. पर्रीकर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तत्पूर्वी त्यानी मुंबईला जाऊन उपचार घेतला होता.