पर्यटक बुडण्याच्या घटना; व्यावसायिकांना आवाहन

0
94

गेल्या काही दिवसांपासून पर्यटक समुद्रात बुडून मृत्युमुखी पडण्याच्या दुर्घटनांची पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांना संभाव्य धोक्याच्या सूचना वेळोवेळी देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दारूच्या नशेत तसेच सूर्यास्तानंतर समुद्रात स्नानासाठी जाणार्‍या पर्यटकांना धोक्याची सूचना देण्याची गरज आहे. त्याकामी पर्यटक व्यवसायातील लोकांची मदत घेण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री आजगावकर यांनी सांगितले. राज्यातील शॅकमालक, किनारपट्टी भागातील व्यावसायिकांनी पर्यटकांना धोक्याच्या सूचना देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.