पत्रकार गौरी लंकेश यांची बेंगळुरूत हत्या

0
233

कर्नाटकमधील ‘लंंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादक ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची बेंगळुरुतील राजा राजेश्‍वरी परिसरातील राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर बेंगळुरूत खळबळ माजली आहे. घरात घुसून तीन हल्लेखोरांनी गौरी लंकेश यांच्यावर सात गोळ्या झाडल्या. गोळीबार करून हल्लेखोरांनी पळ काढला.