पणजीत ११ रुग्ण सापडले

0
257

पणजी परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी नवीन ११ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या ४६ झाली आहे. रायबंदर, फोंडवे भागात ११ रुग्ण आढळले आहेत. मिरामार, सांतइनेज, मळा या भागात प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. मळा भागातील २० जणांच्या स्वॅबची चाचणी काल करण्यात आली आहे.

हळदोणा, कांदोळी परिसरात रुग्ण आढळून आले आहेत. हळदोणा येथे २ रुग्ण आढळले आहेत. कांदोळी येथे १ रुग्ण आढळला असून रुग्णसंख्या २२ झाली आहे.

कोलवाळ येथे नवीन ४ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ४७ झाली आहे. शिवोलीमध्ये १ रुग्ण आढळून आला असून रुग्णसंख्या १४ झाली आहे. मये परिसरात २ रुग्ण आढळले आहेत. पर्वरी येथे आणखी १ रुग्ण आढळून आला असून रुग्णसंख्या २३ झाली आहे.

मडगावात सर्वाधिक २० रुग्ण
मडगाव परिसरात नवीन २० रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ९२ झाली आहे. लोटली येथे नवीन १ रुग्ण आढळला आहे. नावेलीमध्ये नवीन २ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या २० झाली आहे.
वास्को भागात १२ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ३८५ झाली आहे. कुठ्ठाळी येथील रुग्णांची संख्या ३७८ आहे.
धारबांदोडा येथे ७ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ४९ झाली आहे. सांगे येथे आणखी १ रुग्ण आढळून आला आहे.