पणजीत प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

0
63

पणजी महानगरपालिकेने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदीसाठी पाऊल उचलले असून काल १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा मुक्तीदिन सोहळ्यात येत्या ३० मे पासून राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील नगरपालिका आणि पंचायतींनी प्लॅस्टिक बंदीसाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्लॅस्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरामुळे कचर्‍याची समस्या जटिल बनली आहे. त्यामुळे कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय पणजी महानगरपालिकेने घेतला आहे.