पणजीत तिघे अल्पवयीन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

0
104

>> नॅनो कारसह पाच दुचाक्या हस्तगत

पणजी पोलिसांनी चोरी प्रकरणी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नेनो कार व पाच दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. तिघेही अल्पवयीन चोरटे पणजी स्थानकाच्या हद्दीतील असून चौकशीनंतर त्यांची मेरशी येथील अपनाघरमध्ये रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
तिघेही मुलगे आगशी, पर्वरी व इतर भागातून वाहने चोरून आणून पणजी परिसरात चालवायचे. नेनो कारगाडी वेर्णा येथून चोरून आणल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. येथील पोलिसांनी सोमवारी रात्री संशयास्पद स्थितीत फिरताना तिघांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता वाहन चोरीची माहिती उजेडात आली आहे. पणजी पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी चोरी प्रकरणी फोंडा भागातील तीन अल्पवयीन मुलांना अटक करून चोरीचा चार ते पाच लाखांचा ऐवज हस्तगत केला होता.