पंतप्रधानांच्या कार्यशैलीबद्दल व्यंकय्यांकडून प्रशंसा

0
138

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीची प्रशंसा करताना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मोदी स्वत:ही झोपत नाही व आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनाही झोपू देत नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधानांची अशी कार्यशैली असली त्या कार्य शैलीचाही आम्ही आनंद घेत आहोत. कारण मोदी जे काही करत आहेत ते सर्वसामान्यांच्या हितासाठीच असे नायडू यांनी स्पष्ट केले.केंद्रीय मंत्रिमंडळातील काही सहकार्‍यांनी मत मांडले की देशातील प्रत्येक नागरिकाला बँक खातेधारक बनविण्यासाठी पाच वर्षे लागतील. परंतु पंतप्रधानांनी हे काम एका वर्षात व्हायला हवे असे सांगितल्याची माहिती नायडू यांनी दिली. पंतप्रधानांनी जनधन योजनेचा प्रारंभ केल्यानंतर सात आठवड्यांमध्ये ६.६९ कोटी लोक बँक खातेधारक बनले आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. ही योजना सुरू होण्याआधी ५८ टक्के लोकांचे प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांचे बँक खातेच नव्हते असे ते म्हणाले.