पंच सदस्यांकडून जीवे मारण्याची धमकी

0
106

असोल्डा पंचायतीचे पंच सदस्य किस्तोर बस्त्यांव फर्नांडिस व दयानंद कुशाली नाईक यांनी शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शशिकांत जिवाजी नाईक यांनी कुडचडे पोलीस स्थानकात नोंदविली आहे. दोडयाळ, शेळवण येथे राहाणारे शशिकांत नाईक यांच्याकडे असलेल्या बागायती व शेतजमिनीत दोघाही पंच सदस्यांकडून जेसीबी मशीन घालून डोंगरकापणी करण्यात येत असतेवेळी आपण त्यांना या बेकायदेशीर डोंगर कापणीविषयी विचारले असता दोघांनीही आपणावर हल्ला करून आपणास ढकलून दिले, वाईट शिविगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली, असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.