पंचायत संचालकपदी पंचवाडकर आर्लेकर मच्छीमारी संचालकपदी

0
77

राज्याच्या कार्मिक खात्याने नागरी सेवेतील १७ वरिष्ठ अधिकार्‍याच्या बदल्याचा आदेश काल जारी केला आहे. मच्छिमारी खात्याच्या संचालकपदी विनेश आर्लेकर, पंचायत संचालकपदी अजित पंचवाडकर, राज्य निबंधक व नोटरीपदी आशुतोष आपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पंचायत संचालिका संध्या कामत यांची बदली करण्यात आली असून त्यांची एसटी आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दामोदर शंके यांची प्रिटींग व स्टेशनरी खात्याच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नारायण व्ही. प्रभुदेसाई यांची सिव्हील डिफेन्सच्या डेप्युटी कंन्ट्रोलरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्यामसुंदर परब यांची मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे एनआरआयच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा राहणार आहे.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सचिव विनेश आर्लेकर यांची मच्छिमारी खात्याच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मच्छिमारी खात्याच्या संचालकपदाच्या अतिरिक्त ताबा आयएएस अधिकारी गोविंद जैस्वाल यांच्याकडे होता. विजय परांजपे यांची अतिरिक्त सचिवपदी (प्रोटोकॉल) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे सार्वजनिक तक्रार खात्याच्या संचालकपदाचा ताबा राहणार आहे. रुही रेडकर यांची सार्वजनिक बांधकाम खात्यात संचालकपदी (प्रशासन) नियुक्ती करण्यात आली आहे. दिपाली नाईक यांची महिला व बालकल्याण खात्यात संयुक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजन सातर्डेकर यांची गोवा हस्तकला महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

स्नेहा मोरजकर यांची राजभाषा संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे गोवा कोकणी अकादमीच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त ताबा राहणार आहे.
सुरेंद्र नाईक यांची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी – २ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. उमेशचंद्र जोशी यांची जलस्त्रोत खात्यात संचालकपदी (प्रशासन) नियुक्ती करण्यात आली आहे. सिध्दी हर्ळणकर यांची अतिरिक्त संचालक – पंचायत – १ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मिला झुझारटे यांची एसएलएओ- जीआयडीसी येथे बदली करण्यात आली आहे. लॉरै ब्रिटो यांची गोवा पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दशरथ रेडकर यांच्याकडे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त ताबा राहणार आहे.
प्रिंटीग खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर यांना पुढील आदेशापर्यंत कार्मिक विभागात हजेरी लावण्याची सूचना करण्यात आली आहे.