न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच : सुप्रीम कोट

0
113

>> एसआयटी चौकशीची याचिका फेटाळली

न्यायाधीश बी. एच. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच होता. या प्रकरणातून केवळ न्यायव्यवस्थेची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी किंवा इतर स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येणार नाही, असा स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशी करणारी जनहित याचिकाही काल फेटाळली.

कॉंग्रेस नेते पुनावाला, पत्रकार बंधूराज लोणे आणि बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने लोया मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सादर केली होती. त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. चंद्रचूड, न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने वरील निर्णय दिला. लोयांसोबत जे न्यायाधीश प्रवास करत होते, त्यांच्यावर संशय व्यक्त करू शकत नाही. ज्या पद्धतीने जनहित याचिकांचा राजकीय वापर होत आहे, ते पाहता हा न्यायपालिकांच्या बदनामीचा प्रयत्न आहे, असे चंद्रचूड यांनी नमूद केले.