न्यायालयातून पळालेल्या कैद्याला फिल्मी स्टाईलने पकडले

0
75

>> म्हापसा येथील प्रकार; दोन पोलीस कर्मचारी जखमी

बलात्कार प्रकरणी अटकेत असलेला नाजरेरियन आरोपी कॅनेथ उपवेगा याने काल बुधवारी म्हापसा न्यायालयातून पलायन केले असता पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करूक त्याला लगेच जेरबंद केले. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या दरम्यान म्हापसा न्यायालयात त्याला सुनावणीसाठी आणले असता ही घटना घडली. यावेळी दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.
वरील आरोपी बलात्कार प्रकरणी कोठडीत असून काल त्याला न्यायालयात आणले होते. न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख १७ जून रोली दिल्यावर पोलीस बंदोबस्तात पोलिसांच्या बसमध्ये बसवून पुन्हा कोलवाळ येथील कारागृहात नेत असताना त्याने हवालदारांना धक्काबुक्की करून त्यांच्या हातातून निसटून धूम ठोकली. यानंतर हवालदार दामोदर परब, नीलेश मांद्रेकर, पोलीस बसचालक मंजूनाथ नाईक यांनी त्याचा पाठलाग केला. त्यांनी वेळ न दवडता रॉबर्ट पोलिसांना फोनवरून माहिती देताच रॉबर्ट पोलिसांनी अलंकार थिएटरजवळ त्याला घेराव घालून अटक केली. त्यावेळी पोलीस कर्मचारी दामोदर परब, नीलेश मांद्रेकर हे काही प्रमाणात जखमी झाले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
पोलिसांनी त्याचा सिने स्टाईलने पाठलाग करून म्हापसा येथील अलंकार थिएटरजवळ त्याला अटक केली.
पर्रा, साळगाव रस्त्यावरील आलवामार हॉटेलजवळ गेल्या वर्षी ३० मे २०१६ रोजी संध्याकाळी सव्वाचार ते सातच्या वरील नायजेरियन आरोपीने ३९ वर्षांच्या महिलेला सुर्‍याचा धाक दाखवून तिच्या खोलीवर नेऊन बलात्कार केल्याची तक्रार म्हापसा पोलिसांत दिली होती. त्यावर म्हापसा पोलिसांनी नाजरेरियन संशयित कॅनेथ याला ४८ तासांच्या आत पनवेल, मुंबई येथून पनवेल पोलीस व पनवेल रेल्वे स्थानक पोलिसांच्या सहकार्याने अटक केली होती.
पीडित महिला आपल्या स्कूटरवरून घरी जात असताना दोन नायजेरियनांनी तिचा पाठलाग केला होता.