नोबेल पारितोषिक मालिकेस आज प्रारंभ

0
71

नोबेल पारितोषिक मालिका भारत २०१८ च्या दुसर्‍या आवृत्तीला गुरूवार १ फेब्रुवारीला कला अकादमी पणजी येथे प्रारंभ होत आहे. या नोबेल पुररस्कार मालिकेला पाच नोबेल पुरस्कार विजेते उपस्थित राहणार आहेत.

यानिमित्त १ ते २८ फेब्रुवारीपर्यत नोबेल पुरस्कार प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते संध्याकाळी ३.१५ वाजता नोबेल पुरस्कार मालिका कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. यावेळी जे. मायकल बिशप (१९८९ – नोबेल विजेते), रिचर्ड जे. रॉबट्‌र्स (१९९३- नोबेल विजेते), क्रिस्तियन न्युसेलिन – व्होलार्ड (१९९५ – नोबेल विजेते), सर्गे हारोच (२०१२ -नोबेल विजेते), टोमस लिंडाहल ( २०१५ – नोबेल विजेते) उपस्थित राहणार आहेत. २ रोजी सकाळच्या सत्रात नोबेल विजेते शालेय विद्यार्थी, संध्याकाळच्या सत्रास शिक्षक व उद्योजकांशी संवाद साधणार आहे. ३ रोजी मडगाव येथील रवींद्र भवनात विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचे आयोजन केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या सहकार्याने करण्यात आले आहे.