नोटाबंदी विरोधात कॉंग्रेसची निषेध रॅली

0
85

गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीने काल शहरात रॅली काढून केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय बेकायदा आहे. आरबीआय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नव्हता. नोटाबंदीच्या निर्णयामुळे लाखो लोकांना रोजगाराला मुकावे लागले, अशी टीका गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी केली.

जीएसटीमध्ये दर निश्‍चित करताना योग्य विचार करण्यात आलेला नाही. जीएसटीसाठी कॉँग्रेसच्या काळात तयार करण्यात आलेल्या दरात भाजप सरकारने बदल केले. त्यामुळे सामान्य व्यापार्‍यांना त्रास सहन करावे लागत आहेत, असेही नाईक यांनी सांगितले.
यावेळी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, फ्रान्सिस सिल्वेरा, विल्फेड डिसा, क्लाफासियो डायस, महिला अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो नोटाबंदीवर हल्लाबोल केला.