नोटाबंदी योग्यवेळीच : मोदी

0
65

राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी निर्णयाचे समर्थन करत देशाची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असताना सदर निर्णय योग्यवेळी घेतल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींना चिमटा काढला. सोमवारी आलेल्या भूकंपाचा उल्लेख करून मोदी म्हणाले, याची धमकी पूर्वीच दिली होती. अखेर तो भूकंप काल आलाच. तेव्हा सभागृहात हास्याची एकच लहर उसळली. मोदींनी विरोधकांच्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर देताना अर्थसंकल्प, काळा पैसा, सर्जिकल स्ट्राइक, शेतकर्‍यांना खतपुरवठा, ग्राहकांना थेट लाभ या प्रश्‍नांची उत्तरे दिली.

नोटाबंदी निर्णयावर बोलताना मोदी म्हणाले की आम्हांला निवडणुकीची नव्हे तर देशाची चिंता आहे. चांगल्या अर्थव्यवस्थेसाठी नोटाबंदीची गरज होती. हा निर्णय घेण्याची तीच योग्य अशी वेळ होती. स्वच्छ भारत प्रमाणेच नोटाबंदीमुळे देशातील काळा पैसा व भ्रष्टाचार नष्ट होणार आहे. या निर्णयामुळे मोठमोठ्या लोकांना त्रास होत आहे. भविष्यात त्यांचे त्रास आणखी वाढतील असे मोदी म्हणाले.