नोएल, अजित, अरुण, दीपक पात्र

0
94

गोव्याचे टेबलटेनिसपटू नोएल नोरोन्हा व सचिन सुआरिस (४० वर्षांवरील), अजित घाटकर, दीपक गोपानी, जोसेफ सिकेरा, आनंद नाईक, अरुण नाईक व संजीव अफजलपूरकर (५० वर्षांवरील) व उदय वळवईकर (६० वर्षांवरील) यांनी आपापले साखळी सामने जिंकून ‘फोर्झा आंतरराष्ट्रीय व्हेटरन्स चषक २०१७’ टेबल टेनिस स्पर्धेच्या वैयक्तिक प्रकारातून मुख्य फेरीत स्थान मिळविले.

गोवा टेबल टेनिस संघटना, फोर्झा स्पोटर्‌‌स मॅनेंजमेंट व गोवा क्रीडा प्राधिकरण यांनी संयुक्तपणे आयोजित या स्पर्धेतील सामने ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये खेळविण्यात येत आहेत. ४० वर्षांवरील सांघिक प्रकाराच्या उपांत्यपूर्व फेरीत नोएल व सचिन जोडीला शूरवीर संघाच्या आर. राजेश व विकास महाजन यांच्याकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. राजेश व विकास जोडीने अंतिम फेरीत रोहित चौधरी व विवेक भार्गव यांना ३-० असे हरवून ४० वर्षांवरील गटाचे विजेेतपद पटकावले. ५० वर्षांवरील सांघिक प्रकारात ‘थिंक ए’ संघ विजेता ठरला. या संघातील सुनील बबरास व विवेक अळवणी यांनी टीम पंजाबच्या पंकज शर्मा व विवेक अरोडा यांना ३-० असे गारद केले.