नव्या सीआरझेड कायद्यामुळे किनारपट्टीचे अस्तित्व धोक्यात

0
125

>> आम आदमी पक्षाला भीती

केंद्र सरकारची नवी ‘किनारपट्टी विभाग व्यवस्थापन योजना’ (सीझेडएमपी) जर संमत झाली तर राज्यातील किनारपट्टी उद्ध्वस्त होईल, अशी भीती आम आदमी पार्टीने व्यक्त केली आहे. त्यासंबंधी सामाजिक संघटनांच्या सहकार्याने आम आदमी पक्ष जनतेमध्ये जागृती घडवून आणणार असल्याचे पक्षाचे नेते एल्विस गोम्स यांनी काल सांगितले.
आम आदमी पार्टी या प्रश्‍नी विविध पंचायत क्षेत्रात जागृती घडवून आणणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोव्याच्या किनारपट्टीसाठी ही योजना विनाशकारक ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला. ह्या नव्या सीआरझेड कायद्याला लोकांनी जोरदार विरोध करावा, अशी मागणीही गोम्स यांनी केली आहे.

हा नवा कायदा संमत झाल्यास किनारपट्टीवर राहणार्‍या स्थानिकांना तेथून हाकलले जाईल, अशी भीती गोम्स यांनी व्यक्त केली आहे. नव्या किनारपट्टी विभाग व्यवस्थापन योजनेनुसार ह्या योजनेखाली येणार्‍या गावांवर संबंधीत पंचायती व नगरपालिका यांचा काहीही हक्क राहणार नसल्याचे गोम्स यांनी सांगितले.