नदाल नंबर १

0
232

स्पेनच्या राफेल नदालने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला मागे टाकत काल जाहीर झालेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत अपेक्षेप्रमाणे पहिला क्रमांक मिळविला. मायामी ओपनमध्ये फेडररचा जॉन इस्नरकडून पराभव झाल्यानंतर नदालचे पहिले स्थान निश्‍चित झाले होते. जानेवारी महिन्यातील ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीनंतर एकही सामना न खेळलेल्या नदालला १८ फेब्रुवारी रोजी आपला पहिला क्रमांक गमवावा लागला होता. फेडररने त्याचे स्थान घेतले होते. इस्नरने आठ क्रमांकांची मोठी उडी घेत नवव्या क्रमांकावर हक्क सांगितला आहे.

एटीपी ‘टॉप १०’ ः १. राफेल नदाल (स्पेन, ८७७०), २. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड, ८६७०), ३. मरिन चिलिच (क्रोएशिया, ४९८५), ४. आलेक्झांडर झ्वेरेव (जर्मनी, ४९२५), ५. ग्रिगोर दिमित्रोव (बल्गेरिया, ४६३५), ६. युआन मार्टिन डेल पोत्रो (अर्जेंटिना, ४४७०), ७. डॉमनिक थिएम (ऑस्ट्रिया, ३६६५), ८. केविन अँडरसन (द. आफ्रिका, ३३९०), ९. जॉन इस्नर (अमेरिका, ३१२५), १०. डेव्हिड गॉफिन (बेल्जियम, ३११०)