नदालचे अव्वलस्थान धोक्यात

0
222

स्पेनच्या राफेल नदाल याने काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या एटीपी क्रमवारित पुरुष एकेरीमध्ये आपले पहिले स्थान कायम राखले आहे. नदाल जायबंदी असल्याने स्वित्झर्लर्ंंडचा रॉजर फेडरर त्याला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे महिला एकेरीत डेन्मार्कच्या कॅरोलिन वॉझनियाकीने आपले अव्वलस्थान अधिक भक्कम केले आहे. नदालला मागे टाकून २०१२ ऑक्टोबरनंतर प्रथमच पहिला क्रमांक प्राप्त करण्यासाठी फेडररला सध्या सुरु असलेल्या रॉटरडॅम ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करावा लागणार आहे. पायाच्या दुखापतीमुळे नदाल या स्पर्धेत सहभागी झालेला नाही. वीस वेळचा ग्रँडस्लॅम विजेता फेडरर व नदाल यांच्यात केवळ १५५ गुणांचे अंतर आहे.

डब्ल्यूटीए महिला एकेरीत पहिल्या स्थानावरील वॉझनियाकी व दुसर्‍या स्थानावरील हालेप यांच्यात ३५० गुणांचे अंतर आहे.
एटीपी क्रमवारी ः१. राफेल नदाल (स्पेन, ९७६० गुण), २. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड, ९६०५), ३. मरिन चिलिच (क्रोएशिया, ४९६०), ४. आलेक्झांडर झ्वेरेव (जर्मनी, ४४५०), ५. ग्रिगोर दिमित्रोव (बल्गेरिया, ४४२५), डॉमनिक थिएम (ऑस्ट्रिया, ४०६०), ७. डेव्हिड गॉफिन (बेल्जियम, ३४००), ८. जॅक सॉक (अमेरिका, २८८०), ९. जुआन मार्टिन डेल पोट्रो (अर्जेंटिना, २८१५), १०. पाब्लो कारेनो बुस्टा (स्पेन, २७०५)
डब्ल्यूटीए क्रमवारी ः १. कॅरोलिन वॉझनियाकी (डेन्मार्क, ७९६५ गुण), २. सिमोना हालेप (रोमानिया, ७६१६), ३. इलिना स्वितोलिना (युक्रेन, ५८३५), ४. गार्बिन मुगुरुझा (स्पेन, ५६९०), ५. कॅरोलिना प्लिस्कोवा (झेक प्रजासत्ताक, ५४४५), ६. येलेना ओस्टापेंको (लाटविया, ५०००), ७. कॅरोलिन गार्सिया (फ्रान्स, ४४९५), ८. व्हीनस विल्यम्स (अमेरिका, ४२७७), ९. अँजेलिक कर्बर (जर्मनी, ३०३१), १०. ज्युलिया जॉर्जेस (जर्मनी, २९००)