नदालची दुसर्‍या फेरीत धडक

0
242

स्पेनच्या अव्वल मानांकित राफेल नदाल तसेच महिला एकेरीतील द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा यांनी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत काल मंगळवारी विजयी सलामी दिली. त्यांनी सरळ सेटमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा फडशा पाडला. नदालने जागतिक क्रमवारीत ७३व्या स्थानावरील बोलिवियाच्या ह्युगो डेलियन याचा ६-२, ६-३, ६-० असा पराभव केला.

हा सामना दोन तास दोन मिनिटे चालला. दुसर्‍या फेरीत नदालचा सामना अर्जेंटिनाच्या फेडरिको डेलबोनिस याच्याशी होणार आहे. प्लिस्कोवाने फ्रान्सच्या क्रिस्टिना म्लादेनोविचचा प्रतिकार ६-१, ७-५ असा मोडीत काढत दुसरी फेरी गाठली. पुरुष एकेरीत चौथ्या मनांकित रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याला अमेरिकेच्या फ्रान्सिस तियाफो याच्याविरुद्ध विजयासाठी चार सेट झुंजावे लागले. मेदवेदेवने हा सामना ६-३, ४-६, ६-४, ६-२ असा जिंकला. पाचव्या मानांकित डॉमनिक थिम याने ऍड्रियन मन्नारिनो याला ६-३, ७-५, ६-२ असे नमवून आगेकूच केली.

अन्य महत्त्वाचे निकाल
पुरुष एकेरी ः पहिली फेरी ः आलेक्झांडर झ्वेरेव (७) वि. वि. मार्को चेकिनाटो ६-४, ७-६, ६-३, स्टॅन वावरिंका (१५) वि. वि. दामिर झुमूर ७-५, ६-७, ६-४, ६-४, ज्यो विल्फ्रेड त्सोंगा (२८) पराभूत वि. आलेक्सी पोपिरिन ७-६, २-६, १-६, ०-०, निक किर्गियोस (२३) वि. वि. लॉरेंझो सोनेगो ६-२, ७-६, ७-६ गाईल मोनफिल्स (१०) वि. वि. येन सून लू ६-१, ६-४, ६-२, प्रज्ञेश गुणेश्‍वरन पराभूत वि. तात्सुमा इटो ४-६, २-६, ५-७.

महिला एकेरी ः पहिली फेरी ः डोना वेकिच (१९) वि. वि. मारिया शारापोवा ६-३, ६-४, अँजेलिक कर्बर (१७) वि. वि. एलिझाबेथ कोकियाराट्टो ६-२, ६-२, बेलिंडा बेनसिच (६) वि. वि. ऍना श्मिदलोवा ६-३, ७-५, सिमोना हालेप (४) वि. वि. जेनिफर ब्राडी ७-६, ६-१