नगरपालिका निवडणुकांसाठी निरीक्षकांची नियुक्ती

0
110

गोवा राज्य निवडणूक आयोगाने फोंडा आणि साखळी नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
फोंडा नगरपालिका मंडळ निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून गोवा राज्य एसटी वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या कामत आणि साखळी नगरपालिकेसाठी राजभाषा खात्याच्या संचालिका स्नेहा मोरजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फोंडा पालिका निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून वाहतूक खात्याचे साहाय्यक लेखा अधिकारी अनिल पडवळ आणि साखळी पालिका निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून आरोग्य खात्याच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनचे साहाय्यक लेखा अधिकारी संजय वेरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.