धेंपो-जीनो यांच्यात अंतिम लढत

0
92

>> प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट

धेंपो क्रिकेट क्लब आणि जीनो क्रिकेट क्लब यांच्यात २५ ते २७ एप्रिलपर्यंत पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर गोवा क्रिकेट संघटना आयोजित प्रीमियर डिव्हिजन लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

काल पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या उपांत्य लढतीत जीनो क्रिकेट क्लबने साळगावकर स्पोटर्‌‌स क्लबविरुद्ध पहिल्या डावात मिळविलेल्या १३९ धावांच्या महत्त्वपूर्ण आघाडीच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला. साळगावकरतर्फे कीनन वाझने १० चौकार व २ षट्‌कारांच्या सहाय्याने १०९ धावांची शतकी केळी केली. तर जीनोच्या दुसर्‍या डावात सगुण कामतने सामन्यातील आपले दुसरे शतक साजरे केले. त्याने १४ चौकार व ३ षट्‌कारांच्या सहाय्याने ११४ धावा केल्या. पहिल्या डावातही सगुणने दमदार शतकी खेळी केली होती.

तर सांगे क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या उपांत्य लढतीत धेंपो क्रिकेट क्लबने चौगुले स्पोटर्‌‌स क्लबवर १० विकेट्‌सनी आकर्षक विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. संक्षिप्त धावफलक ः पर्वरी क्रिकेट अकादमी मैदान – जीनो क्रिकेट क्लब, पहिला डाव ४१५, साळगावकर स्पोटर्‌‌स क्लब, पहिला डाव (४ बाद २०७वरून पुढे) ८६ षट्‌कांत सर्वबाद २७८, (कीनन वाझ १०९, अमित यादव १२ धावा. जलाज सक्सेना ४-७९, सत्यहीत बच्चाव ४-७३, सौरभ बांदेकर २-८१ बळी), जीनो क्रिकेट क्लब, दुसरा डाव ४८ षट्‌कांत ४ बाद २२९, (सगुण कामत ११४, जलाज सक्सेना २९, मंथन खुटकर नाबाद ५०, गौरव देसाई नाबाद ३० धावा. अमोघ देसाई २-२८, उमर नझिर १-२९, सावियो कालको १-२५ बळी).सांगे क्रिकेट अकादमी मैदान ः चौगुले स्पोटर्‌‌स क्लब, पहिला डाव २१०, धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव ३८१, चौगुले स्पोटर्‌‌स क्लब, दुसरा डाव, (बिनबाद ३३वरून पुढे), ४५.३ षट्‌कांत सर्वबाद १९५, (तनिश सावकर ६६, वैभव गोवेकर १२, समर दुभाषी २६, विश्वंभर कहलोन ४१, सुनीकुमार दलाल ३७ धावा. मिलिंदकुमार ४-२७, विनय चौधरी ४-९६, अचित शिगवन १-१५, दर्शन मिसाळ १-५० बळी), धेंपो क्रिकेट क्लब, दुसरा डाव, बिनबाद २५, (आदित्य सूर्यवंशी नाबाद १२, सुबोध भाटी नाबाद १३ धावा).