धूम स्टाईल दुचाकी चालविल्याने युवक ठार

0
80

धूम स्टाईल दुचाकी शर्यत अंगलट येऊन एका युवकाचा काल अंत झाला. तर मोटरसायकलच्या मागे बसलेला दुसरा युवक गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी दोन युवक शबीद शेख व सोहेल खान हे केटीएक जीए ०६ आर ८६८३ या दुचाकीवरून भगवेगाने चिखली विमानतळ मार्गावरून दुसर्‍या एका दुचाकीला मागे टाकण्याच्या प्रयत्नात असताना दुचाकी चालक शबीद शेख याचा आपल्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्याची धडक येथील दुभाजकाला बसली व त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. पाठीमागे बसलेला सोहेल खान याच्या तोंडाला व डोक्याला जबर मार बसला. त्यांना तातडीने चिखली कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले. पण तेथे सोहेल खान (वय १८, रा. बायणा) याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.