धावशिरे शाळेतील ९३ विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार

0
129

धावशिरे उसगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेतील ९३ विद्यार्थ्यांनी बुधवारी दुसर्‍या दिवशी वर्गावर बहिष्कार घातला. शिक्षण खात्याला मुदत देऊनही कायमस्वरूपी शिक्षक पाठविण्यात न आल्याने पालकांत तीव्र नाराजी पसरली आहे. शाळेत पॅरा शिक्षकाऐवजी कायमस्वरूपी शिक्षक पाठविण्याची मागणी पालकांनी शिक्षण खात्याकडे केली होती. मात्र शिक्षण खात्याने याविषयाकडे गांभिर्याने न पाहता २ पॅरा शिक्षकांना शाळेत पाठविण्यास सुरू केले. गेल्या मंगळवारपासून विद्यार्थ्यांसमवेत पालकांनी वर्गावर बहिष्कार घातण्यास सुरुवात केली. मात्र अद्याप शिक्षण खात्याच्या कोणाही अधिकार्‍याने या प्रकरणी साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे पालकांत संताप व्यक्त होत आहे.