धार्मिक सहिष्णुता एकतर्फी नसावी

0
472

 – मारूती अवदी, पणजी
एकविसाव्या ख्रिस्ती शतकात ख्रिस्ती सत्ताधीश आणि धर्माधीश हिंदू समाजाला सर्वधर्मसमभावाचे आणि धार्मिक सहिष्णुतेचे उपदेश करतात आणि आपल्या राष्ट्रातील धूर्त धर्मनिरपेक्ष त्यांच्यापुढे नंदीबैलांप्रमाणे माना हलवतात. जगातील ख्रिस्ती आणि मुस्लिम राष्ट्रांत सर्वधर्मसमभाव आणि धार्मिक सहिष्णुता अस्तित्वात आहेत का? प्रत्यक्षात ख्रिस्ती आणि मुस्लीम राष्ट्रांचे धार्मिक धोरण काय आहे?
धर्माचा जागतिक इतिहास दोन मुद्दे स्पष्ट सांगतो. जगात अनेक धर्म आहेत, पण एकही धर्म परिपक्व नाही. प्रत्येक धर्मात अनेक व्यंगे आणि दोष आहेत, हा पहिला मुद्दा आहे. त्यामुळेच जगातील प्रत्येक धर्माला प्रत्येक राष्ट्रांत अक्षरशः समान वागणूक त्या राष्ट्रातील सत्ताधीश व जनता यांच्याकडून सदैव मिळालीच पाहिजे, हाच सर्वधर्मसमभाव आणि धार्मिक सहिष्णुता यांचा खरा अर्थ आहे. दुसरा मुद्दा सांगतो की, जगातील सर्व ख्रिस्ती आणि मुस्लीम राष्ट्रे धर्मांध आणि असहिष्णु आहेत. सर्वधर्मसमभाव आणि धार्मिक सहिष्णुता फक्त हिंदुस्तानात आणि ‘‘एकधर्मश्रेष्ठभाव व धार्मिक असहिष्णुता’’ सर्व ख्रिस्ती आणि मुस्लीम राष्ट्रांत ही विदारक वस्तुस्थिती आहे. अन्य धर्मियांची धार्मिक मानसिकता जाणण्यासाठी हिंदूंनी ख्रिस्ती-मुस्लीम संघर्षाचे बीज जाणले पाहिजे. जेव्हा ख्रिस्ती धर्माचे बस्तान युरोपात बसले, तेव्हा पृथ्वीचे पूर्ण ख्रिस्तीकरण करण्याचा घाट घातला गेला. ख्रिस्ती धर्म हा एकच खरा धर्म आहे, ख्रिस्त्यांचा देव हा एकच खरा देव आहे. पृथ्वीवरील इतर धर्म आणि त्यांचे देव खोटे आहेत म्हणून इतर धर्मियांनी स्वखुषीने आपले धर्म सोडून ख्रिस्ती व्हावे. जर ते स्वखुशीने ख्रिस्ती झाले नाहीत तर त्यांना जबरदस्तीने ख्रिस्ती करावे असा ख्रिस्त्यांचा धर्मनामा होता. ख्रिस्ती धर्माच्या या मोहिमेला त्यांच्यानंतर ६०० वर्षांनी जन्मलेला मुस्लीम धर्म आडवा आला. जुलूम जबरदस्तीने पृथ्वीचे ख्रिस्तीकरण की मुस्लीमकरण यावर अटीतटीने ‘‘क्रुजेडस आणि जिहाद’’ सुमारे तीनशे वर्षे चालले. पण कोणताही धर्माध गट आपलाच धर्म आणि देव संपूर्ण पृथ्वीवर लादू शकले नाहीत.
दोघाही धर्मांधांचा नक्षा चंगीझखान (११६३-१२२७) नावाच्या मोंगोलियनने नखशिखांत जिरविला. युरोपमध्ये जर्मनी जिंकून चंगीझखानाने जर्मनांना गुलाम केले. चंगीझखान आणि त्याच्या वारसांनी मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्म आणि देवांची टिंगल केली. बगदादच्या खलीफाला मुस्लीम लोक अल्लाचा धार्मिक आणि राजकीय प्रतिनिधी म्हणत. चंगीझखानाने बगदादच्या खलिफाचा खून केला; बगदाद लुटले. ज्या मशिदींना ‘अल्लाचे घर’ म्हणत त्या मशिदींचे घोड्याचे तबेले केले. कुराण घोड्याच्या पायांखाली तुडवले आणि कुराणाची व बायबलची जाळून राख केली. हिंदुस्थानात मुस्लीम आणि ख्रिस्ती आक्रमक हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करून मंदिरातील मूर्ती तोडून, फोडून आणि पायांखाली तुडवून हिंदूंना हिणवत की, तुमचा देव आम्हाला शिक्षा करण्यास भितो म्हणून तुमचा देव खोटा आणि आमचाच देव खरा. पण त्यांचे हे ‘खरे’ देव चंगीझखानाच्या किंवा त्यांच्या वारसांच्या केसालाही हात लावण्यास धजले नाहीत.
संघर्षाच्या दुसर्‍या पर्वात, दोन्ही धर्मांधांनी एकमेकांवर आणि दुसर्‍या राष्ट्रांवर आक्रमणे आणि वसाहतींचे सत्र सुरू केले. दोघांनीही वसाहतींत बळजबरीने धर्मान्तरे केली. हिंदूंचे पहिले धर्मान्तर मुस्लीमांनी आणि दुसरे धर्मान्तर ख्रिस्त्यांनी केले. हिंदुस्थानात हिंदू-मुस्लीम व हिदू-ख्रिस्ती अशा जमाती निर्माण केल्या. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर हिंदूंची धर्मान्तरे स्वखुशीनेच झाली असा कावेबाज प्रचार पद्धतशीरपणे सुरू केला गेला आणि अजूनही करतात. धर्मान्तर स्वखुशीने होते की सक्तीने होते? बुद्धीप्रामाण्य सांगते की स्वखुशीने धर्मान्तरे हे शुद्ध थोतांड आहे. एकूण एक धर्म दोषी असल्याने, जन्मजात धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे म्हणजे दोषांतून दोषांतच जाणे. म्हणूनच कोठेही कोणताही मानव स्वखुशीने धर्मान्तर कधीच करत नाही. इतिहास सांगतो की जगात कोठेही धर्मान्तरे स्वेच्छेने कधीच झाली नाहीत आणि होत नाहीत. सदैव आणि सर्वत्र धर्मान्तरे सक्तीनेच झाली आणि होतात.
विशेषतः ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मसुद्धा युरोपातील आणि आशियातील जनतेने स्वखुशीने स्वीकारले नव्हते. दोन्ही धर्म युरोपात आणि आशियात शस्त्र बळाने आणि जबरदस्तीनेच लादले गेले. युरोपातील ग्रीक आणि रोमन ख्रिस्ती नव्हते. अरब आणि इतर आशियाई मुस्लीम नव्हते. रोमनांनी जिजसला (जेसूस) सुळावर चढवून ठार मारल्यानंतर तीनशे वर्षांनी रोमन राजा कॉंन्स्टंटाईन याने ख्रिस्त धर्म जबरदस्तीने सर्व युरोपियनांवर लादला. ख्रिस्ती धर्माधिशांनी ताबडतोब ख्रिस्तपूर्व युरोपियनांचे देव, पूजापद्धती आणि मंदिरे यांचा समूळ नाश केला. नावनिशाणीही ठेवली नाही.
इतिहास सांगतो की, पुरातन काळी सर्व धर्मांत मूर्तीपूजा होती. ख्रिस्तपूर्व युरोपियन आणि महंमदपूर्व अरब मूर्तीपूजक होते. जशा ग्रीक आणि रोमनांच्या देवता होत्या, तशाच अरबांच्याही होत्या. मक्केतील कबा हे अरबांचे प्रमुख मूर्ती-मंदिर होते. कबा मंदिरात तीनशे साठ मूर्ती होत्या. मुस्लीम धर्माचा संस्थापक महंमद मूर्तीपूजेचा कट्टर विरोधक होता. सत्ताधीश झाल्यावर महंमदने कबांतील सर्व मूर्तींचे भंजन केले आणि शस्त्रबळाने मुस्लीम धर्म अरबांवर लादला.
धर्मांतर राष्ट्रहीत करते की राष्ट्रघात करते? जर धर्मांतर राष्ट्रघात करते तर राष्ट्रघात टाळण्यासाठी राष्ट्राने कोणता तोडगा स्वीकारला पाहिजे? दोन्ही प्रश्‍नांची बिनचूक उत्तरे एका ख्रिस्ती राष्ट्राने सोळाव्या ख्रिस्ती शतकात दिली आणि लगेच अंमलातही आणली. ख्रिस्त्यांच्या आठव्या शतकात मुस्लीमांनी अर्धा युरोपखंड जिंकून सर्व ख्रिस्त्यांना गुलाम केले. सक्तीने असंख्य ख्रिस्त्यांचे धर्मान्तर करून त्यांना मुस्लीम केले आणि युरोपात ख्रिस्ती-मुस्लीम जमात निर्माण केली. अनेक ख्रिस्ती चर्चांच्या मशिदी केल्या. इ.स. ७११ मध्ये स्पेन हे मुस्लिमांनी गुलाम केलेले पहिले ख्रिस्ती राष्ट्र होते. सतत ७९१ वर्षे गुलामगिरीत जगून १५०२ मध्ये ख्रिस्त्यांनी त्यांना हाकलून दिले. ताबडतोब स्पेनमधील ख्रिस्त्यांनी सर्व मुस्लीम मशीदींच्या ख्रिस्ती चर्च केल्या गेल्या. एकसुद्धा मशीद स्पेनमध्ये ठेवली नाही. ख्रिस्ती-मुस्लीमांना तीन पर्यायांपैकी एक पर्याय ताबडतोब स्वीकारण्याचा हुकूम दिला. ते तीन पर्याय कोणते?
१) ख्रिस्ती-मुस्लीमांनी स्पेन सोडून जावे. २) ख्रिस्ती-मुस्लीमांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा. ३) ख्रिस्ती-मुस्लीमांनी मृत्यू स्वीकारावा. असंख्य ख्रिस्ती-मुस्लीमांनी तत्काळ दुसरा पर्याय स्वीकारला. थोडेच स्पेन सोडून गेले. कुणीही मृत्यू स्वीकारला नाही. स्पेनमध्ये ‘धार्मिक अल्पसंख्यंक’ ही चीज उरलीच नाही. जे स्पेनने केले तेच युरोपातील इतर ख्रिस्ती राष्ट्रांनीही मुस्लीमांच्या गुलामगिरीतून सुटता क्षणीच केले.
ख्रिस्ती – मुस्लीमांना शासकीय सक्तीेने ख्रिस्ती करून स्वधर्मात आणणार्‍या ख्रिस्ती राष्ट्रांच्या सत्ताधिशांनी आणि धर्माधिशांनी हिंदू सत्ताधिशांना आणि धर्माधिशांना सर्वधर्मसमभावाचे आणि धार्मिक सहिष्णुतेचे उपदेश करणे हे वारांगनांनी पतिव्रतांना पातिव्रत्यावर प्रवचने झोडण्यासारखे हास्यास्पद आहे. एकतर्फी सहिष्णुता सदैव राष्ट्रघातच करते असे इतिहास सांगतो. हजारो वर्षे अखंड असलेल्या राष्ट्राची फाळणी ख्रिस्त्यांच्या विसाव्या शतकांत एकतर्फी धार्मिक सहिष्णुतेमुळेच झाली. फक्त शस्त्रबळाने जगातील राष्ट्रांवर धार्मिक आणि राजकीय जुलूम करणे हा जगातील ख्रिस्ती आणि मुस्लीम राष्ट्रांचा इतिहास आहे. सध्या मोजकीच राष्ट्रे स्वबळावर अशा प्रवृत्तीला उक्तीने आणि कृतीने ‘जशास तसे’ देत असल्याने दोहोंच्या अरेरावीला लगाम बसला आहे. या राष्ट्रांत चीन आणि इस्त्रायल यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. चीन आणि इस्त्रायलमध्ये धर्मान्तरावर पूर्ण बंदी आहे. वस्तुस्थिती सांगते की हिंदू समाज स्वतःच्या आणि जगाच्या इतिहासापासून बोध घेत नाही. म्हणूनच जगातील एक प्रबळ महासत्ता होण्याची सर्व साधने हाताशी असताना, स्वराज्याच्या ६८ वर्षांत हिंदुस्थान एक तिसर्‍या दर्जाचे दुर्बळ आणि नगण्य राष्ट्र म्हणून जगत आहे.
– मारूती अवदी,
पणजी