धारगळात दोन एटीएम फोडून ३० लाख चोरीस

0
98

धारगळ येथील राष्ट्रीय महामार्ग १७ वरील भर लोकवस्तीतील स्टेट बँक ऑफ इंडिया व कॉर्पोरेशन बँक या दोन बँकचे एटीएम ४ रोजी रात्री २ नंतर अज्ञातांनी फोडून एकूण ३० लाख रुपये चोरीला नेण्याचा प्रकार घडला. पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धारगळ येथील दोन्ही चोर्‍या रात्रो दोन नंतर घडल्याची शक्यता वर्तवली असून, चोरट्यांनी दोन्ही एटीएम गॅस कटरने फोडले व त्यातील पैसे चोरीला नेले .पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद करून पंचनामा केला.