द्रमुक अध्यक्षपदी स्टॅलिन बिनविरोध

0
116

द्रमुक पक्षाचे अध्यक्ष म्हणून या पक्षाचे दीर्घकालीन सर्वेसर्वा स्व. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांची काल बिनविरोध निवड झाली. मोठे बंधू एम. के. अलगिरी यांच्या विरोधाला न जुमानता ही निवड झाली आहे. सुमारे अर्धा शतक अध्यक्षपदी राहिलेल्या करुणानिधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा वारसदार म्हणून आपल्या हयातीतच स्टॅलिन यांची निवड केली होती. एका सभेत स्टॅलिन यांच्या निवडीची घोषणा करण्यात आल्यानंतर द्रमुक कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.