द्युती चंदची ऐतिहासिक सुवर्णधाव

0
165

>> जागतिक विद्यापीठ स्पर्धा

आपण समलिंगी असल्याचे जाहीर करून भारतीय क्रीडा जगतात खळबळ माजविलेली आघाडीची धावपटू द्युती चंद हिने इटलीमध्ये सुरू असलेल्या ‘उन्हाळी जागतिक विद्यापीठ स्पर्धेत’ सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिची ही सुवर्णधाव ऐतिहासिक ठरली आहे. कारण जागतिक विद्यापीठ स्पर्धेत १०० मी. शर्यतीत सुवर्णपदक प्राप्त करणारी द्युती ही पहिलीच भारतीय ठरली आहे. द्युतीने १०० मीटर शर्यतीत सुवर्णधाव घेताना अवघ्या ११.२ सेकंदात शर्यत जिंकली. तसेच यंदाच्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.

स्वित्झर्लंडच्या अँजला डेल पोंटेने (११.३३ सेकंद) रौप्यपदक तर तर जर्मनीच्या क्वायाईने (११.३९ सेकंद) कांस्यपदक पटाकावले. द्युतीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती कोविंद यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.