दोडामार्गला पावसाने झोडपले

0
80

दोडामार्ग (न. प्र.)
गेले काही दिवस दोडामार्ग मध्ये उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना मंगळवारी कोकण व गोवा भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार ढगाच्या गडगडाटासह अनेक गावात पावसाने हजेरी लावून परतीच्या पावसाने झोडपले तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. दोडामार्ग तालुक्यात परतीचा पाऊस तसा पडला नव्हता. त्यातच गेले काही दिवस उकाडा प्रचंड वाढला होता. मंगळवारी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावत तालुक्यातही पाऊस पडला.