दुहेरी किताबाची संधी

0
83

>> शौर्य, लिडिया, रुद्र, सुशील, अर्जुन, तृषा, हर्ष, यशला

शौर्य जोशी, लिडिया बार्रेटो, रुद्र दुकळे, सुशील नायक, अर्जुन फळारी, तृषा जोशी, हर्ष माने व यश देसाई या खेळाडूंना अखिल गोवा प्रमुख मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी किताब मिळविण्याची संधी आहे. मॉर्निंग बॅडमिंटन क्लब व शटलर्स क्लब यांनी गोवा बॅडमिंटन संघटना व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेतील सामने पेडे क्रीडा संकुलात खेळविण्यात येत आहेत. रुद्र दुकळे-आर्यन कुमार वि. चिराग महाले- शिवम सैनी (१५ वर्षांखालील मुलगे दुहेरी), शौर्य जोशी-अर्जुन फळारी वि. आर्यमान सराफ-चेतन मगदुम (१७ वर्षांखालील मुलगे दुहेरी), अँड्रिया कलवमपारा-दिशा दत्ता वि. सिया कोलवाळकर-तृषा जोशी (१५ वर्षांखालील मुली दुहेरी), जिया कामत-श्रिया सराफ वि. दिशा दत्ता-साक्षी के. (१३ वर्षांखालील मुली दुहेरी), सुशील नायक-लिडिया बार्रेटो वि. शौर्य जोशी-तृषा जोशी (१९ वर्षांखालील मिश्र दुहेरी), यश देसाई-हर्ष माने वि. सर्वज्ञ खांडेपारकर-वेदांत चव्हाण (१३ वर्षांखालील मुलगे दुहेरी), शौर्य जोशी-अर्जुन फळारी वि. आर्यमान सराफ-चेतन मगदुम (१९ वर्षांखालील मुलगे दुहेरी), लिडिया बार्रेटो- यास्मिन सय्यद वि. आहना नायक-रिया माल्ल्या (१९ वर्षांखालील मुली दुहेरी) यांच्यात अंतिम सामने खेळविले जाणार आहेत.

उपांत्य फेरीचे निकाल
१३ वर्षांखालील मुलगे एकेरी ः हर्ष माने वि. वि. वेदांत चव्हाण २१-१७, २१-१७, यश देसाई वि. वि. सर्वज्ञ खांडेपारकर २१-१८, २१-१६, मुली ः जिया कामत वि. वि. श्रिया सराफ २१-१६, २१-१८. साक्षी के. वि. वि. न्यासा धुपदळे २१-१०, २१-९, १५ वर्षांखालील मुलगे एकेरी ः रुद्र दुकळे वि. वि. चिराग महाले २१-८, २१-१०, हर्ष माने वि. वि. आर्यन कुमार २१-१५, २१-१६, मुली ः तनुश्री शदानी वि. वि. जिया कामत २१-१०, २१-१३, तृषा जोशी वि. वि. सिया कोलवाळकर २१-८, २१-११, १७ वर्षांखालील मुलगे एकेरी ः रुद्र दुकळे वि. वि. चेतन मगदुम २१-९, २१-८, शौर्य जोशी वि. वि. यश हळर्णकर २१-१२, २१-४, मुली ः लिडिया बार्रेटो वि. वि. तनुश्री शदानी २१-१२, २१-९, आहना नायक वि. वि. तृषा जोशी २१-१६, १६-२१, २१-१४, १९ वर्षांखालील मुलगे ः एकेरी ः सुशील नायक वि. वि. यश हळर्णकर २६-२४, २१-१५, शौर्य जोशी वि. वि. रुद्र दुकळे १५-२१, २१-१४, २१-९, मुली ः लिडिया बार्रेटो वि. वि. तनुश्री शदानी २१-८, २१-५, यास्मिन सय्यद वि. वि. आहना नायक २१-८, २१-९.