दुप्पट कृषी उत्पन्नाचे उद्दिष्ट ः श्रीपाद

0
77

केंद्र सरकारकडून शेती विकासावर भर दिला जात असून २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. कंत्राटी शेतीमुळे पडीक शेतजमीन लागवडीखाली येण्यास चालना मिळणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केले.

केंद्र सरकारने पिकाच्या आधारभूत किमतीमध्ये केलेल्या वाढीचा शेतकर्‍यांना निश्‍चितच लाभ मिळणार असल्याचे ते म्हणाले. शेतकर्‍यांना युरिया खत मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. यापूर्वी शेतकर्‍यांना युरिया खत मुबलक प्रमाणात मिळत नव्हते. शेतकर्‍यांच्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून शेतकर्‍यांना पीक लागवडीसाठी योग्य मार्गदर्शन केले आहे. केवळ मंत्री, आमदारांनी शेतात उतरून शेतीच्या उत्पादनात वाढ होणार नाही. तर सर्वच नागरिकांनी शेतात उतरण्याची गरज आहे. शेतात काम केल्याने आरोग्य चांगले राहू शकते, ते म्हणाले.