दीनदयाळ स्वास्थ्य योजना; इन्शुरन्स कंपनीला मुदतवाढ

0
108

सरकारने दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेंतर्गत युनायटेड इन्शुरन्स कंपनीला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. दीनदयाळ अंतर्गत इन्शुरन्स कंपनीला मुदतवाढ देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१७ मध्ये पहिल्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती.

राज्य सरकारने नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना सुरू केली आहे. या योजनेखाली सरकारी आणि नोंदणीकृत खासगी हॉस्पिटलमधील वैद्यकीय खर्च सरकारकडून उचलला जातो. प्रथम वर्षासाठी या योजनेचे कंत्राट युनायटेड इन्शुरन्स कंपनीला देण्यात आले होते.

राज्य सरकारने नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी या विमा कंपनीशी एका वर्षाचा करार केला होता. नागरिकांच्या वैद्यकीय सेवेच्या बिलांची फेड या कंपनीकडून केली जात होती. सरकारने या योजनेसाठी नागरिकांना आरोग्य कार्ड उपलब्ध करून दिली आहेत. सरकारकडून या आरोग्य विमा योजनेचा आढावा घेतला जात नाही. या योजनेचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. नवीन आर्थिक वर्षात या योजनेचे नूतनीकरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.