दिवाळी; एक चिंतन

0
231

– विनायक विष्णू खेडेकर

सामाजिक, कौटुंबिक स्तरावर गावा-गावांतून जाणवते की दिवसेंदिवस देवापेक्षा देवचाराला महत्त्व येऊ लागलंय. अशा दैवतशक्तींचे उन्नयन होऊन त्याना देवत्व देणे, मंदिरात प्रतिष्ठापनेनंतर पूजा-अर्चादी कर्मकांडांत त्याना बांधून ठेवणे नेहमीचे झालेले आहे. हे वाईट नसले तरी चुकीच्या सांस्कृतिक व धार्मिक प्रथांचे प्रस्थापन आहे. नरकासुराचे उदात्तीकरण हा याच मानसिकतेचा अपरिहार्य परिपाक आहे, न केवल  वैचारिक बदल, पण सांस्कृतिक उलथा-पालथीचे संकेत सांगणार्‍या, इशारे देणार्‍या या घटना आहेत…सामाजिक, कौटुंबिक स्तरावर गावा-गावांतून जाणवते की दिवसेंदिवस देवापेक्षा देवचाराला महत्त्व येऊ लागलंय. अशा दैवतशक्तींचे उन्नयन होऊन त्याना देवत्व देणे, मंदिरात प्रतिष्ठापनेनंतर पूजा-अर्चादी कर्मकांडांत त्याना बांधून ठेवणे नेहमीचे झालेले आहे. हे वाईट नसले तरी चुकीच्या सांस्कृतिक व धार्मिक प्रथांचे प्रस्थापन आहे. नरकासुराचे उदात्तीकरण हा याच मानसिकतेचा अपरिहार्य परिपाक आहे, न केवल  वैचारिक बदल, पण सांस्कृतिक उलथा-पालथीचे संकेत सांगणार्‍या, इशारे देणार्‍या या घटना आहेत…

 

भारतीय संस्कृतीच्या कोंदणात विराजमान हिंदू धर्मशास्त्र, लोकधर्म आणि प्रथा-परंपरांनी सजवलेली संस्कृती यांचा सुरेख समुच्चय जिथे घडतो ती दिवाळी. प्रदेश, प्रांत, गाव, निवासी जमाती, याही पलीकडे भौगोलिक, पर्यावरणीय व निसर्ग संरचना यानुसार बदलणारी दिवाळी. आविष्करण पद्धती भिन्न असूनही भारतीय बिरुद अभिमानाने मिरवणारे, आसेतू हिमाचल साजरे होणारे उत्सव; शिगमा-होळीखेरीजचा दुसरा महत्त्वाचा म्हणजे दिवाळी.

खरा हा उत्सव नव्हेच. ही एक शृंखला, सण- पर्व- व्रत यांची. शिष्ट व लोक हा भेद बाजूला सारत, प्रदेश- जमात- गाव यानुसार आचरित होणार्‍या विधींची एक साखळी. प्रथा, चाली, रीती, रिवाजांच्या असंख्य दुव्यांनी गुंङ्गलेली अशी. गोवत्स द्वादशी,  लोकजीवनातील वसुबारस; आश्‍विन महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यातील बारावी तिथी. दिवाळीची खरी सुरुवात या दिवशी होते. गोव्यात नसला तरी पशिचम महाराष्ट्र; अर्थात मूळ मराठी, पण आज कर्नाटकात असलेल्या अनेक गावांतून वसुबारस हा सण साजरा होतो. दुसरा दिवस धनत्रयोदशीचा. अनेक कुटुंबांतून व्रत म्हणून आचरिला जाणारा. तिसरा ही नरकचतुर्दशी. गोव्यात नरकासुरवध व दिवाळीचा मुख्य दिवस मानला जाणारा. चौथी अमावास्या, हा दिवस व्यापारी, दुकानदार, विक्रेते व काही कुटुंबांत व विशेष ठिकाणी सार्वजनिक लक्ष्मी पूजनाने सिद्ध होणारा. यानंतर येतो कार्तिक महिना. पहिलाच दिवस, ती बलिप्रतिपदा. धर्मशास्त्रातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अर्धा मुहूर्त, शुभदिन. गोमंतकीय जनजीवनात ‘दिवाळे पाडवो’ किंवा ‘गोरवां पाडवो.’ सहावा दिवस भाऊबीज या सणाचा. पुराणानी वर्णिलेली, शिष्टांच्या आचरणातली. बहुतेक ठिकाणची दिवाळी या दिवशी सुङ्गळ संपूर्ण होते.

गोव्याचं सगळचं वेगळं. शिष्ट व लोक हे संस्कृतीचे दोन भेद ठसठशीतपणे दाखवणारं. शिष्टांची दिवाळी भाऊबीजेपर्यंतच चालते. लोकजीवनात ही ‘धाकली दिवाळी,’ त्याना ङ्गारशी महत्त्वपूर्ण न वाटणारी. त्यांची मुख्य ती ‘थोरली दिवाळी.’ द्वादशीला लुळशी लग्नाने मोठ्या धामधुमीत साजरी होणारी. जणू घरात मुलीचे लग्नकार्य आहे या भावनेनं वृंदावनात वाढविलेल्या तुळशीच्या रोपट्याचं लग्न लावायचं. गोव्याच्या दिवाळीत आत्यंतिक महत्त्व असलेले पोहे, धाकल्या दिवाळीला नसले तरी चालतात पण तुळशी लग्नात हवेच. गाभुळल्या चिंचेचे, आवळ्याचे, खोबर्‍याचे व उसाचे तुकडे घातलेले सुके पोहे; नैवेद्य तर दाखवायचाच, पण प्रसाद म्हणून लोकाना वाटण्याअगोदरचा एक महत्त्वाचा विधी. वेगळेपण दाखविणारा. वरील मिश्रण व्यवस्थित कालवून ओंजळभर ‘ङ्गो खायो’ असे म्हणत तीन वेळा आकाशात उडवायचे. सांगितले गेले की हा विधी पितरांसाठी आहे. पण त्याचं स्वरूप पाहिलं तर अंतिमतः भूमीवरील कृमी-कीटक, जीव-जंतूंसाठीचा हा प्रकार आहे.

जनजीवनात पोह्यांचे विविध पदार्थ याच दिवशी बनतात. अंगण सारवणं, तुळशी वृंदावनाची डागडुजी व रंगकाम करणं, रानावनातील वस्तूनी तुळशी वृंदावनासह परिसर शृंगारण, ही कामे हातावेगळी केली जातात. कुटुंबीजनांचं प्रातःकालीन अभ्यंगस्नान झालं की सकाळपासूनच लग्नाची लगबग सुरू होते. तुळशीला तेल-हळद लाऊन न्हाऊं घालणं. दुपारी पक्वान्नांचा नैवेद्य होतो. लग्नविधी आटोपल्यानंतर सुवासिनी स्त्रियांची जोडवी पेटविणे हा प्रकार असतो. नव्याने लग्न होऊन आलेल्या सुनेसाठी तिच्या माहेराहून साडी-ओटी, ङ्गराळाचे पदार्थ, पुजेचे सामान; यात खास करून कापसाच्या छोट्या वातींचा जुडगा; असे दोन एकत्र केले की त्याला ‘जोडवें‘ म्हणायचे. अशी पाच जोडवी. तुळशीला हळद-कुंकू, ङ्गूल वाहून, बहुधा केळीच्या गाभ्याच्या तुकड्यात, तेलात भिजवलेला वातींचा जुडगा पेटवून, त्यासह वृंदावनाला तीन ङ्गेरे करायचे, पाणी सोडायचं. हे विवाहितेसाठी सौभाग्य व्रत आहे. जनलोकांघरची ही दिवाळी खूपच उत्साहानं, उमेदीनं आणि धूमधडाक्यात साजरी होते.

कारीट हे पावसाळ्यात राना-वनात उगवणार्‍या वेलीला येणारे काकडीसम दिसणारे, अंड्याच्या आकाराचे, कडू चवीचे ङ्गळ आहे. या ङ्गळाचा दिवाळीशी निकटचा संबंध आहे. दिवाळीच्या आदल्या सायंकाळी पाणी तापविण्याची तांब्याची मडकी, हंडा वा भाण नाव असलेले, लोकांघरी मातीचा बुडकुला; हे भांडे घासून पुसून स्वच्छ करायचे. त्याला गंधाची उटी, झेंडू ङ्गुलांच्या माळा, सोबतच कारीट ङ्गळे असलेली वेल गुंडाळायची. पण कारीट हे नरकासुराचे प्रतीक मानत असल्याने दिवाळीच्या सकाळी त्याची अधिक गरज असते. साग्रसंगीत आंघोळ झाल्यानंतर नवीन कपडे घालून घरातील बहुधा पुरुष माणसे जवळच्या देवळात जातात. मंदिराच्या पायरीशी हे कारीट ठेवून ते डाव्या पायाच्या अंगठ्याने ङ्गोडायचे, मग बोटाने त्याची कडू चव जिभेवर ठेवायची. हे प्रतीकात्मक नरकासुर हनन. बदलत्या परिस्थितीत, हवामानात गावातसुद्धा कारीट दुर्मीळ होत चाललेय. खर्‍या गोंयकाराला कारीट मिळाल्याखेरीज दिवाळी झालीशीच वाटत नाही. संस्कृतीची बूज राखणारा नागर जनही या कारिटासाठी आटापिटा करतो.

कृषिसंस्कृतीचा वारसा सांगणार्‍या गोव्यातील ग्राम निवासी लोकांचा पाडवा हा दिवाळीतील पहिला दिवस असतो. गुरांसह गोठाही स्वच्छ करणे, गुरांची पूजा करून त्यांच्या गळ्यात झेंडू ङ्गुलांच्या माळा घालणे. याचवेळी घरात गृहिणी पोळे, जाड डोसा, खरा कर्नाटकी उतप्पा तयार करते. गोठ्यातल्या जनावरांना हे पोळे भरवणे हा विधीचा प्रकार आहे. मग हे पोळे घरातल्यांना खायला मिळतात. कुठे धेणल्यासाठीही काढून ठेवले जातात.
धेंणलो हा गुराख्यांचा पाडव्याच्या दिवशीचा उत्सव. गुरांना चरायला सोडल्यानंतर रानातच दगडांचे तात्पुरते देऊळ उभारून, त्यावर काटक्या-कुटक्यांचे छप्पर, आत श्रीकृष्णाची काष्ठमूर्ती, रान-वनाच्या पाना-ङ्गुलानी सजवलेली. झेंडूच्या ङ्गुलमाळानी शृंगारलेल्या लाकडी घुमटीत ती मूर्ती ठेवून घरोघर नेऊन नाचवायची. अजून ङ्गोंडा तालुक्यातील काही गावांतून गावातील मुले एकत्र येऊन धेणलो करतात. कंबरेवर हात ठेवून, कंबर हलवीत, त्याच त्या पारंपरिक पंक्ती गातात ःधे धेणल्यो रे धेणल्या पावस शेणल्यो|आमचो धेणलो गेलो वांगडी|केळ्याच्यो साली खावन पोट रगडी॥हे होते, कधी अजून एक कडवे जोडले जाते.धेणल्याची म्हातारी| शेळें ऊन खाताली॥ पण यात पूर्वींचा तो जोम नाही. रानङ्गुलांनी शृंगारलेली घुमटी, आतील कृष्ण यांचे अप्रूप आता राहिले नसल्याने अलीकडचा धेणला कृत्रिम वाटतो. नाचणार्‍या मुलांतही ङ्गारसा उत्साह नसतो. राहिलीय एक परंपरा, भोगावळ नावाची.अनेक घरांच्या अंगणात शेणातून एका नगरीची प्रतिकृती बनायची. याला गोकुळ, गोठा, कृष्णनगरी अशी विविध नावे. यात छोटीशी कृष्णमूर्ती बसायची, ङ्गुलांनी सजलेली. शेजारी तेवती पणती. या नगरीत गोप, गोपी, गायी-गुरे अशांच्या छोट्या खेळण्यातल्यासारख्या प्रतिमा, राना-वनातील नैसर्गिक सामग्रीने बनविलेल्या, सजविलेल्या. यात कारीट ङ्गळाचा भरपूर उपयोग केला जातो. आज ङ्गार थोड्या ठिकाणची अंगणे सुशोभित करणारी ही नगरी उभारलेली असते, पण त्या नगराचे सांस्कृतिक वैभव अभावानेच दिसते. सृजनाची आस असलेली तरुण मुले, विशेषतः दिवाळीत व्हॉट्‌स अप, ङ्गेसबुकवर दंगलेली. खेरीज शेणात हात घालायला नाकं मुरडणारी.

घाटमाथ्यावरील अनेक गावांतून सापडणारी ‘वसुबारस ’ ही परंपरा अशीच पण मूळ धारणा, आशय, कार्य, कारण नव्हे संकल्पनाच वेगळी. येथे बळीराजाच्या पूजेने, अंगणात शेणाने बनविलेल्या प्रतिकृतीतून बळीराजा, गौळणी आदी साकारतात. पाडव्यापर्यंत रोज एक असे पाच डोंगराचे थर उभे राहातात. एकमेव पुरुष बळीराजाच्या राज्यातलं छोटसं नगर. जिथे गुण्या-गोविंदाने राहणारे, कामसू वृत्तीचे लोक संस्कृतीच्या आश्रयाने समृध्दीत राहतात, इथे आहेत काम करणार्‍या गौळणी. बहुतेक प्रत्येक घरातील महिला आपापल्या अंगणात अशी नगरी उभी करते. हरएक गृहिणी आपली नगरी इतरांहून वेगळी व अधिक आकर्षक बनविताना दिसते. हे गोव्यात असते तर माटोळी, नाताळातील गोठा याप्रमाणे हा शेणाचा बळीराजाही स्पर्धात्म झाला असता.

प्रथमतः गोधन, मग गायी-गुरांचे खिल्लार, गुरे, गुराखी, कृषिसंस्कृतीतील महत्त्वाचा बैल, गुरांना चरण्यासाठी गावकार्‍यांनी मोकळी सोडलेली कुळणे ही चरावू गवताळ जमीन, त्या गुराख्यांचे विविध खेळ, एकेक संकल्पना मोडीत निघाल्या. हे गुराखी रिकाम्या वेळी केवण, कुंबयो अशा वनस्पतींच्या सालीतील तंतूपासून छान कृत्रिम ङ्गुलाचे गोंड, त्यांच्या माळा बनवून पाडव्याला गुरांच्या गळ्यात बांधायचे. कधी या ङ्गुलांना जाङ्गळीण या ङ्गळातून मिळणार्‍या नैसर्गिक लाल रंगाने रंगवायचे. सारेच इतिहासजमा झाले.वैश्‍विकीकरण, व्यापारीकरण, माध्यमांच्या अतिरेकी मार्‍यातून घुसळत चाललेले समाज जीवन न केवळ एवढे, पण असंभव वाटावे असे बदलते ऋतुचक्र, निसर्गचक्र, पशू, पक्षी जीवनचक्र, परिणामस्वरूप, बदलणार्‍या सामाजिक, सांस्कृतिक धारणा, आपापतः नगर-शिष्ट, ग्रामीण-लोक, वन्य-आदिवासी अशांची जीवनशैली मूलरूपात राहणे, पाहण्याची इच्छा बाळगणेसुद्धा असंभाव्य, अन्यायकारक ठरावे.‘आज दिवाळी म्हणजे नरकासुर’ अशी गोव्याची प्रतिमा तयार झालीय. स्पर्धा, बक्षिसे, चित्ररथांचा डामडौल, ऑटोमेशन्, मेकॅनिझम्, डॉल्बीतून निघणारे कर्णकर्कश, परदेशी थाटाचे संगीत. एक निराळा माहोल तयार होतो आहे. या सार्‍यातून वेगळे अर्थकारण दिसू लागलेय. पूर्णतः स्थानिक व मोङ्गत मिळणार्‍या सामग्रीतून, गावकर्‍यांच्या सर्जनशीलतेतून तयार होणारी, लोकवाद्यांच्या ठेक्यावर नाचविली जाणारी, गावातील त्या ठराविक भागापुरती मर्यादित असलेली नरकासुर प्रतिमा; आज बाजारात सारं-पुरं विकत मिळू लागलंय. स्पर्धा तर खेड्या-वाड्यांपर्यंत पोचलेल्या. एकाच पथकानं उभा केलेला चित्ररथ निरनिराळ्या शहरातील स्पर्धेत भाग घेऊन लाख रुपयावरची रक्कम बक्षीस रूपाने कमावतो. सांस्कृतिक तर आहेच, पण ग्रामव्यवस्थेने नियंत्रित केलेले समाजजीवनाचे चित्र पार पालटून जाते इथे.

विषयांतराचा आरोप स्वीकारून जोजवत्या व्यथांची ही दोन शब्दरूप स्वगते :सामाजिक, कौटुंबिक स्तरावर गावा-गावांतून जाणवते की दिवसेंदिवस देवापेक्षा देवचाराला महत्त्व येऊ लागलंय. अशा दैवतशक्तींचे उन्नयन होऊन त्याना देवत्व देणे, मंदिरात प्रतिष्ठापनेनंतर पूजा-अर्चादी कर्मकांडांत त्याना बांधून ठेवणे नेहमीचे झालेले आहे. हे वाईट नसले तरी चुकीच्या सांस्कृतिक व धार्मिक प्रथांचे प्रस्थापन आहे. नरकासुराचे उदात्तीकरण हा याच मानसिकतेचा अपरिहार्य परिपाक आहे, न केवल  वैचारिक बदल, पण सांस्कृतिक उलथा-पालथीचे संकेत सांगणार्‍या, इशारे देणार्‍या या घटना आहेत…गौरी लंकेशच्या हत्येचा निषेध करण्यासाठी जमलेल्यातील काही अलीकडेच भेटलेले, बहुतेकांना या गौरी लंकेशचे कार्य, कर्तृत्व सोडून द्या, पण ‘तो’ का ‘ती’ हेसुद्धा माहीत नसणे, भाद्रपदातील चवथीला गणेशजन्म झाल्याचे म्हणणे, ‘शिगमा’ बरोबर असले तरी ‘शिमगा़.’ मराठीतील म्हणून लिहिणे, प्रत्यक्षात नरकासुराचा वध सत्यभामेने केला. श्रीकृष्ण मूर्च्छित झाले होते. तरी त्याचे श्रेय कृष्णाला देणे. सांस्कृतिक भूलथापांचे उदाहरण न्हणून नोंद व्हावे असे हे काही. सारेच चिंतनीय!