दिवाळीच्या गोडव्याचा आनंद घ्या,

0
142

– वर्षा नाईक

* दिवाळीतील मिठाई तुमच्या सगळ्या प्रिय आणि जवळच्या व्यक्तींनासुद्धा वाटा म्हणजे तुमच्या पोटात माफक प्रमाणातच जातील. अशा मिठाया भेट म्हणून निवडा ज्यांमध्ये तूप आणि साखर कमी प्रमाणात असेल……
* पारंपरिक गोमंतकीय गोड पदार्थ जसे दूध-पोहे, दही-पोहे, बटाटे-पोहे, चण्याची उसळ, अंबाड्याची आमटी इत्यादी हे पदार्थ तळलेल्या पदार्थांपेक्षा निश्‍चितच चांगले.

गोड पदार्थांचं असं आहे की ते आपण पोटात ढकलतो, पण ते आपल्या शरीरावर परिणाम करतात. इथे गोड पदार्थांबद्दल काही गोष्टी देत आहे.
१ चमचा साखर म्हणजे ५ ग्रॅम- २५ किलोकॅलरी ऊर्जा देते. कोकाकोलाच्या नेहमी मिळणार्‍या कॅनमध्ये १० चमचे साखर असते, जर निवडीचा पर्याय उपलब्ध असेल तर नेहमी फळाच्या रसाची निवड करायची कारण त्यातली साखर रसात विरघळलेल्या स्वरूपात असते आणि फळात फायबर असतात ज्यामुळे पचनाला उशीर लागतो व त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.

एक गोष्ट लक्षात ठेवा की तयार बंद डब्यांवरील लेबल वाचावे आणि त्यात साखर किती प्रमाणात आहे ते बघावे, कारण त्यामध्ये ग्लुकोज, मध, लॅक्टोज, सॉर्बिटॉल, ब्राऊन शुगर, सुक्रोज या स्वरूपात साखर असते. साखर ही नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्हचे काम करते त्यामुळे नेहमी पदार्थांमध्ये असते ज्यामुळे पदार्थ खराब होत नाही. उदा. इन्स्टंट सूप, करी मिश्रण, जॅम, जेली इत्यादी. म्हणूनच या स्वरूपातील ऊर्जा आपण टाळू शकत नाही. तसेच लेबलवर ‘लो-फॅट’ लिहिलेलं असेल पण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असू शकते. बर्‍याच जणांना वाटतं की ‘कृत्रिम स्वीटनर्स’ हा चांगला पर्याय आहे, उलट ते जास्त समस्या निर्माण करतात. धोकादायक होऊ शकतात. म्हणून यमी स्वीट्‌स खा आणि माफक प्रमाणात आहाराचे नियम पाळून ही दिवाळी साजरी करा.
* दिवाळीचे गोड पदार्थ जर घरी करणार असाल तर चांगल्या फॅटी ऍसिडचे प्रमाण असलेले तेल वापरा आणि त्याचे तळणाचे तापमान जास्त असू द्या.
* कच्चे सलाड भरपूर बनवा आणि किमान एक फळ जसे संत्र, पेरू, पपई, मोसंबी, सफरचंद दररोज खा.
* जास्तीचे दोन-तीन ग्लास कोमट पाणी प्या ज्यामुळे विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातील.
* कमीत कमी अर्धा तास गतीने चालावे आणि शिवाय तुमचे नित्य रोजचे जे व्यायाम करता त्याच्या वेळेत किंवा तीव्रतेमध्ये वाढ जरी केली नाही तरी ते टाळू नयेत.
* आरोग्यदायी मिठाई आणि नमकिन ज्यामध्ये सुका मेवा, प्रथिनांचे प्रमाण जास्त असेल पण साखर, मैदा आणि तूप कमी प्रमाणात असेल अशाच पदार्थांची निवड करा.
* पारंपरिक गोमंतकीय गोड पदार्थ जसे दूध-पोहे, दही-पोहे, बटाटे-पोहे, चण्याची उसळ, अंबाड्याची आमटी इत्यादी हे पदार्थ तळलेल्या पदार्थांपेक्षा निश्‍चितच चांगले.
* दिवाळीनंतर कमीत कमी तीन दिवस तरी तुम्ही गोड पदार्थांचे सेवन करू नका.
– दिवाळीतील मिठाई तुमच्या सगळ्या प्रिय आणि जवळच्या व्यक्तींनासुद्धा वाटा म्हणजे तुमच्या पोटात माफक प्रमाणातच जातील.
– अशा मिठाया भेट म्हणून निवडा ज्यांमध्ये तूप आणि साखर कमी प्रमाणात असेल, तसेच निरोगी पर्याय जसे सुका मेवा किंवा कठीण कवचाची फळे, ताजे रसगुल्ले किंवा साखर नसलेले संदेश, साखर सिरप यांची निवड करा.