दिल्लीत ओबामांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा

0
101
दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासमवेत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल भारताच्या ६६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला. भारतीय सैन्य दले आणि नारी शक्तीने केलेल्या शक्ती प्रदर्शनाने जगाला भारतीय सामर्थ्यांचे दर्शन घडवले.विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बराक ओबामा हे पत्नी मिशेल यांच्यासह रिमझिम पावसातच राजपथावर दाखल झाले. याच वातावरणात मोदी यांनी नंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे या ठिकाणी स्वागत केले. व नंतर राष्ट्रपती मुखर्जी यानी दिमाखात तिरंगा फडकावून मानवंदनाही स्वीकारली.
सैन्य दलांच्या संचालकानी भारताच्या संरक्षण दलांच्या सामर्थ्यांचे दर्शन घडविले. मात्र या संचालनातील ठळक आकर्षण ठरली ती महिलांची पथके. ‘कंधोंसे मिलते है कंधे, तो कदमोंसे कदम मिलते है, हम चलते है, जब ऐसे तो दुश्मन के दिल हिलते है,’ या गीतांसह देशाच्या नारी शक्तीने जगाला दर्शन दिले. विविध राज्यांच्या सांस्कृतिक पथकांनी गीतांच्या तालावर नृत्य सादरीकरणासह संचलन केले. सोहळ्याचा समारोप हवाई दलाच्या सुखोई व मिग-२९ के या विमानांनी उपस्थितांसमोर थरारक कसरती सादर केल्या.