दिल्लीतील भाजप खासदार उदित राज कॉंग्रेसमध्ये

0
102

दिल्लीचे विद्यमान भाजप खासदार उदित राज यांनी यावेळी भाजपने लोकसभेसाठी तिकीट न दिल्याने काल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेस प्रवेश केला. आपल्याला उमेदवारी दिली जाणार नाही याची माहिती आधी दिली असती तर आपण दुखावलो गेलो नसतो असे उदित राज यांनी यावेळी सांगितले.