दिल्लीतील बैठकीनंतर वाहन कायद्याविषयी गोव्यात प्रस्ताव

0
104

नवी दिल्ली येथे गुरुवार १६ जानेवारी २०२० रोजी राज्यांच्या वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेत केंद्र सरकारच्या नवीन मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत विविध राज्यातील वाहतूक मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर राज्यात नवीन मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहे, असे वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

केंद्र सरकारने वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणण्याच्या उद्देशाने नवीन मोटर वाहन कायद्यात दंडाच्या रक्कमेत वाढ केलेली आहे. नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. तथापि, गोव्यातील रस्त्याची स्थिती योग्य नसल्याने अद्यापपर्यंत नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने नव्याने तयार केलेल्या कायद्यात वाढविण्यात आलेले दंडाचे शुल्क कमी करण्याचा अधिकार नसल्याचे आपले वैयक्तिक मत आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

दिल्ली येथील वाहतूक मंत्र्याच्या परिषदेत विविध राज्याच्या वाहतूक मंत्र्याशी नवीन मोटर वाहन कायद्यावर चर्चा करून त्यांनी कशा पद्धतीने केंद्र सरकारच्या मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. याबाबत माहिती जाणून घेणार आहे.