दिगंबर कामत यांची दोन तास चौकशी

0
144

>> खाण घोटाळा प्रकरण

गुन्हा अन्वेषण विभागाच्या खास तपास पथकाने (एसआयटी) ३५ हजार कोटींच्या कथित खाण घोटाळा प्रकरणी काल माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांची सुमारे दोन तास चौकशी केली.

काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आमदार कामत एसआयटी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. यानंतर तपास अधिकार्‍यांनी त्यांना खाण घोटाळा प्रकरणी विविध प्रश्‍न विचारून कसून चौकशी केली. खाण घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री कामत मुख्य संशयित असून त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती हवी असल्याने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. त्यामुळे त्यांची जबानी महत्त्वाची असल्याचे चौकशीनंतर एसआयटीच्या ज्येष्ठ अधिकार्‍याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना २००७ ते २०१२ या कार्यकाळात सुमारे ३५ हजार कोटींचा खाण घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह तत्कालीन खाण सचिव राजीव यदुवंशी, माजी खाण संचालक अरविंद लोलयेंकर यांच्याविरोधात २०१३ साली तक्रार नोंदवण्यात आली होती.