दाबोळीत २८ लाखांचे सोने विमान प्रवाशाकडून जप्त

0
101

गोवा कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर काल केलेल्या कारवाईत एअर इंडिया विमानातून (एआय-९९४) २८ लाख रुपये किंमतीचे ९९५ ग्राम सोने जप्त केले. संबंधित प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया एआय ९९४ या विमानात जाऊन कस्टम विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईवेळी एका सीटवर दोन चांदीच्या रंगाच्या लहान पिशव्या नजरेस पडल्या. त्या पिशव्यांत त्यांना चॉकलेटी रंगाची सोन्याची पावडर सापडली. सदर आसनावरील प्रवाशाने ती आपल्या आसनाखाली सेफ्टी जॅकेटमध्ये लपवून ठेवली होती. कस्टम अधिकार्‍यांनी सदर प्रवाशाकडे याविषयी चौकशी केली असता त्याने त्या बॅगेतील सोने आपण आणल्याची कबुली दिली. कस्टम अधिकार्‍यांनी सदर सोने जप्त करून सदर प्रवाशाला ताब्यात घेतले. सदर सोन्याची किंमत २८.६२ लाख रुपये एवढी होत असून एकूण ९९५ ग्राम वजनाचे सदर सोने होते. कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.