दादाच्या निवृत्तीनंतरच ‘टेस्ट’मध्ये संधी

0
146

>> अधिक कसोटींत खेळायला आवडले असते ः युवराज

मर्यादित षटकांच्या सामन्यांप्रमाणेच कसोटी क्रिकेटमध्ये जास्त संधी न मिळाली नाही, असे भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याने काल शुक्रवारी सांगत खंत व्यक्त केली. मला सौरव गांगुली निवृत्त झाल्यावर संधी मिळाली, पण दुर्दैवाने मला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि माझ्या आयुष्याने एक वेगळे वळण घेतले’, असे युवराज म्हणाला.

भारताला अनेक सामने एकहाती जिंकून दिलेला युवराज म्हणाला की, ‘जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला असे वाटते की मला कसोटी संघात पुरेशी संधी मिळाली नाही. पण त्या दिवसांत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली सारख्या स्टार खेळाडूंमध्ये जागा मिळवणे कठीण होते. मधल्या फळीत जागा मिळवणे अवघड होते’.

आजच्या पिढीतील खेळाडूंना किमान दहा-बारा कसोटी सामने खेळण्याची संधी मिळते. आम्हाला एक किंवा दोन संधीनंतरच बाहेर बसावे लागत असे.

युवराज म्हणाला, ‘मी माझ्या कुटुंबाचा, मित्रांचा, सहकार्‍यांचा आणि चाहत्यांचा आभारी आहे, ज्यांनी मला प्रत्येक मार्गावर पाठिंबा दिला आहे आणि प्रेरणा दिली आहे.

युवराज भारताकडून ४० कसोटी सामने खेळला आहे. २००३ ला कसोटी पदार्पण केल्यानंतर युवराजने कसोटीत ३ शतकांसह १९०० धावा करता आल्या. त्याच्या नावावर ९ बळीदेखील आहेत. युवराजने त्याच्या कारकिर्दीत ४० कसोटीव्यतिरिक्त ३०४ वनडे सामने आणि ५८ आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. वनडेत त्याने ८७०१ धावा केल्या आणि १११ बळी घेतले आहेत तसेच टी-ट्वेंटीमध्ये त्याने ११७७ धावा केल्या आणि २८ गडी बाद केले आहेत.