दहावी परीक्षेचा मंगळवारी निकाल

0
202

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल २०१९ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी सकाळी ११.३० वाजता पर्वरी येथे जाहीर करण्यात येणार आहे. २३ मे रोजी सकाळी ९ ते १.३० यावेळेत गुणपत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

गोवा शालान्त मंडळातर्फे दहावीची परीक्षा २ ते २३ एप्रिल या काळात घेण्यात आली होती. ही परीक्षा २८ केंद्रांतून घेण्यात आली असून परीक्षेसाठी १९,३४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मुरगाव तालुक्यातील विद्यालयांचा सेंट ऍण्ड्यू संस्था वास्को, सासष्टी आणि काणकोण तालुक्यांतील विद्यालयांचा लॉयला विद्यालय मडगाव, केपे आणि सांगे तालुक्यांतील विद्यालयांचा एसईएस कुडचडे, फोंडा व धारबांदोडा तालुक्यांतील विद्यालयांचा आल्मेदा फोंडा, तिसवाडी तालुक्यातील विद्यालयांचा प्रोग्रेस पणजी, बार्देश आणि पेडणे तालुक्यांतील विद्यालयांचा ज्ञानप्रसारक म्हापसा, डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील विद्यालयांचा प्रोग्रेस साखळी येथे वितरित केला जाणार आहे. खासगी उमेदवारांना आपल्या गुणपत्रिका आल्त बेती येथील मंडळाच्या कार्यालयातून हॉल तिकीट दाखवून नेता येईल. निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला जाणार आहे, असे कळविण्यात आले आहे.