दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे चार प्रयत्न उधळले

0
97

>> ७ जणांचा खात्मा; ४८ तासातील कारवाई

भारतीय सैनिकांनी गेल्या ४८ तासांत भारतीय हद्दीत पाक पुरस्कृत घुसखोरीचे चार प्रयत्न उधळून लावले. तसेच या दरम्यान सात दहशतवाद्यांना खात्मा केल्याची माहिती काल भारतीय लष्कराकडून देण्यात आली. दरम्यान उत्तर काश्मीरच्या नौगाम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारतीय सैनिकांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. यावेळी भारताचा एक जवानही शहीद झाला.

गेल्या ४८ तासांतील वरील घटनांविषयी एक निवेदन भारतीय लष्कराने जारी केले. त्यानुसार पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरच्या गुरेज, मच्छिल, नौगाम व उरी या विभागांमधून घुसखोरीचे जोरदार प्रयत्ने केले. मात्र भारतीय जवानांनी ते यशस्वी होऊ दिले नाही. ७ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासह त्यांच्याकडील मोठ्या प्रमाणातील शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. काल नौगाममध्ये तीन तर बुधवारी मछिल भागात चौघा दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.
भारतीय सैनिकांच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे गुरेज भागात काही दहशतवाद्यांनी पाक हद्दीत पळ काढला. घुसखोरी करू पाहणार्‍या दहशतवाद्यांना पाक हद्दीत पाकिस्तानी लष्कराकडून कवच पुरविले जात होते असेही या निवेदनात म्हटले आहे.
यावर्षी भारतीय लष्कराच्या घुसखोरी विरोधी पथकाने आतापर्यंत पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचे एकूण २२ प्रयत्न विङ्गल ठरवले असून ३४ दहशतवाद्यांना ठार केले आहे. रमझानच्या सणादरम्यानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये दहशत निर्माण करण्याचा पाकचा डाव असल्याचे निवेदनात म्हटले आहे.